उच्च प्रतीचा व गुणवत्तापूर्ण मुरघास कसा बनवावा
आपल्या डेअरी फार्मवर चांगली गुणवत्ता मुरघास तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट
काय होईल, जर..
- रोजचा लागणारा चारा आणण्यासाठी रोज शेतात जाऊन चारा कापणीची गरज राहिली नाही
- आपल्या दुभत्या पशूंना प्रथिनांनी भरपूर हिरवा चारा रोज मिळू लागला
- चाऱ्यावर होणारा अतिरिक्त खर्चात कपात होऊन पशूंच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागली
- उन्हाळी दिवसांत चाऱ्याच्या कमतरतेचा प्रश्न कायमचा निकाली निघाला
- कामगारांच्या मजुरीवर होणाऱ्या खर्चात बचत करू शकला
- आपल्या दुग्ध व्यवसायामधून अधिकचा नफा मिळवू शकलात
या सर्व गोष्टी जर समजा सत्यात उतरल्या तर यापेक्षा आपल्यासाठी आनंदाची पर्वणी कोणती असेल? जशा असंख्य यशस्वी डेअरी व्यवसायिकांच्या या इच्छा सत्यात उतरल्या त्याचप्रमाणे आपल्या बाबतीतदेखील हे घडू शकते. आपण जेव्हा मुरघास बनवून तो आपल्या दुभत्या पशूंना द्यायला सुरुवात कराल तेव्हा आपण आपल्या डेअरी फार्ममध्ये वर नमूद केलेले बदल पाहायला सुरुवात कराल.
पावसाचे दुर्भिक्ष असणाऱ्या प्रदेशात, उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणे स्वाभाविक आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना हिरवा चार उपलब्ध होणे दुरापास्त होते, ज्याचा विपरीत परिणाम दुभत्या पशूंना मिळणाऱ्या पोषक घटकांवर होतो. यामुळे, त्वरित आपल्याला दुधात घट जाणवायला सुरुवात होते. चाऱ्याची गरज भागवण्याकरता शेतकरी इतर पर्यायांकडे वळतो ज्यामुळे जनावरांच्या नियंत्रित आहाराच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडतो. याची परिणीती जनावरांच्या आतल्या पोटात असणाऱ्या मायक्रोफ्लोरा घटकांना इजा पोचण्यास सुरुवात होऊन कधीकधी पोटातून त्यांचे अस्तित्वदेखील संपण्याची भीती असते. अशा प्रकारचे अपायकारक बदल दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कायमची कमी करू शकतात.
बऱ्याच लोकांना अशी भीती असते की मुरघास बनवताना बऱ्याच चुका होऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण मुरघास खराब होण्याची वेळ येऊ शकते. मुरघासाबद्दल इत्यंभूत माहिती असलेल्या तज्ञ व्यक्तीकडून एकदा का याचे शास्त्र अवगत करून घेतले की यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होता. टेप्लू मध्ये आम्हाला विश्वास आहे की, तंत्रशुद्ध डेअरी फार्मिंग क्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि संशोधन संस्था यांच्या मदतीने आम्ही आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती प्रदान करू शकू.
शास्त्रीय पद्धतीने मुरघास बनवण्याचा अशा प्रकारचा प्रथमच कोर्स आम्ही तयार केला आहे जो आपणाला प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध राहील. आम्ही हा कोर्स आपल्यासाठी चक्क मोफत उपलब्ध करून देत आहोत. हा कोर्स चालू असताना आपल्याला येणाऱ्या शंका किंवा प्रश्न आपण सरळ कमेन्टबॉक्सद्वारे विचारू शकता. आपल्या फार्मसाठी यशस्वीरित्या मुरघास बनवण्याकरता आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी तसेच व्यावसायिक स्तरावरील वितरकांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे. आपणही आनंदाने या कोर्सचा उपयोग करून घ्या.
भेटा आपल्या प्रशिक्षकांना
प्रशिक्षक
डॉ. शैलेश शामराव मदने
बी.वी.एस.सी & ए. एच.
ते
एक डेअरी फार्म सल्लागार आहेत. ते जीआरएमएफ (GRMF) पुरस्कारचे विजेते आहेत आणि त्यांनी
गुणवत्तेच्या दुध उत्पादन सेवा (QMPS) प्रयोगशाळेत 3 महिन्यांसाठी कॉर्नेल विद्यापीठ,
न्यूयॉर्क, यूएसए (Cornell University, New York, USA) येथे अभ्यास केला आहे. त्यांनी
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे विस्तार प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
डॉ.संतोष वाकचौरे
डॉ.संतोष वाकचौरे ह्याना पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून त्यानी पशुविकृति शास्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून घेतले आहे.त्यानी बी.व्ही.एस.सी ही पदवी घेत असताना पशुपोषण शास्त्र,पशु औषधि शास्त्र व् पशु प्रजनन शास्त्रात सुवर्ण पदक मिळविलेले आहे.
श्री.अनिल कानवड़े
श्री.अनिल कानवड़े हे एक प्रगतशील शेतकरी आहेत. ते अहमदनगर
जिल्ह्यात निमगाव पागा नावाच्या छोट्या गावात राहून आधुनिक पद्धतीने पशुपालन व् शेतीव्यवसाय
करतात.गेल्या काही वर्षात त्यांनी आधुनिक पद्धतीने व व्यवसायिक दृष्टिकोण ठेवून आपली
शेती ६ एकरावरुन ३० एकरापर्यंत वाढविली आहे.त्यांच्या मुक्तसंचार गोठ्यावर चारा नियोजन
व निर्मितीच्या चतुसुत्री चा अवलंब करुण देशी व संकरित गाईंचे पालन केले जाते.
डॉ.अशोक धिंदळे
डॉ.अशोक धिंदळे हे पशुपोषण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण
घेऊन सदया पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यानी बी.व्ही.एस.सी शिरवळ पशुवैद्यकीय
महाविद्यालय येथून व् पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रिय डेरी संस्था करनाल येथून पूर्ण केले
आहे.
या कोर्सची मला कशा प्रकारे मदत होईल?
या कोर्समध्ये प्रत्यक्ष फार्मला भेटी देऊन त्याठिकाणी शास्त्रीय पद्धतीने मुरघास बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया चालू असतानाचे 18 हून अधिक विडियो बनवले आहेत. हे विडियो पाहिल्यानंतर आपणदेखील सहजरीत्या मुरघास बनवू शकाल. मागच्या काळात काही लोकांनी मुरघास बनवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. या कोर्सच्या माध्यमातून मुरघास बनवण्याच्या प्रक्रियेत तज्ञ असलेल्या व्यक्तींनी मुरघास बनवताना राबवलेली प्रक्रिया आणि त्यात त्यांनी मिळवलेले यश हे सगळे आपणाला अनुभवता येईल.
या कोर्समध्ये मुरघास बनवताना आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि त्या अडचणींना बंगाल कशी द्यायची याची तपशीलवार माहिती दिली आहे. यामुळे मुरघास बनवताना आपण योग्य पद्धतीचाच अवलंब करत आहोत याचा आत्मविश्वास येईल. मुरघास बनवताना कोणत्याही टप्प्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून तज्ञांकडून आपल्या शंकांचे समाधान मिळवू शकता.
आपल्या लघु, माध्यम किंवा मोठ्या अशा कोणत्याही स्वरूपाच्या फार्मसाठी आपण मुरघास बनवू इच्छित असाल तरी हा कोर्स आपणाला तितकाच उपयुक्त आहे. बॅग, खड्डे किंवा बंकर अशा तिन्ही पद्धतींनी मुरघास कसा तयार करावा याचे तंत्र या कोर्सद्वारे आपण आत्मसात कराल. मुरघासासाठी लागणारे विविध क्षमतेचे खड्डे आणि बंकर कसे असावेत याचा तक्तादेखील या कोर्ससोबत आपणास मिळेल. आमचे हजारो वापरकर्ते ज्या पद्धतीने ते त्यांच्या फार्ममध्ये मुरघास तयार करत आहेत, त्याच पद्धतीने या कोर्समधील उपलब्ध असलेले विडियो पाहिल्यानंतर आपणसुद्धा बनवायला सुरुवात कराल.
व्यावसायिक पातळीवर मुरघासाची निर्मिती करून आपल्या ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असाल तर या कोर्समध्ये बेलींग मशीन वापरून मध्यम ते मोठ्या स्तरावर मुरघास कसा तयार करावा हेदेखील शिकवले जाईल.
“उच्च प्रतीचा मुरघास कसा तयार करावा” हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील गोष्टींमध्ये सक्षम बनाल:
- चारा कापणीसाठी चारापिकाचा योग्य कालावधी कोणता ते ओळखणे
- योग्य प्रमाणात घटक असणारा उच्च दर्जाचा मुरघास तयार करणे
- बॅग, खड्डे, बंकर किंवा मशीनचा वापर करून मुरघास तयार करणे
- मुरघासाची गुणवत्ता वर्षभर राखून ठेवणे
- मुरघास तयार करण्यावर होणाऱ्या खर्चाचा ताळेबंद तयार करणे
- आपल्या दुभत्या पशूंना दररोज उत्कृष्ट दर्जाच्या पोषक-घटकांनी परिपूर्ण मुरघास दररोज देणे