फायदेशीर दुग्धव्यवसायाचा ए-टू-झेड कोर्स
डेअरी फार्ममधील व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्तम कोर्स
अभ्यासक्रमाची किमंत ४९९९ रू. सवलतीसह.
टेप्लूमध्ये आम्ही दुग्धव्यवसायाचा उत्कृष्ट ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. आपणास स्वतःचा डेअरी फार्म सुरू करायचा असेल किंवा आपल्या विद्यमान डेअरी फार्मचा विस्तार करायचा असेल तर आपल्याला यशस्वी बनविण्यासाठी येथे योग्य मार्गदर्शन मिळेल. शेतकर्यांना व्यवसायात भेडसावणाऱ्या व्यावहारिक समस्यांचा विचार करून वैज्ञानिक डेअरी फार्मचा हा आपला कोर्स काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. दुग्ध उद्योगातील उत्तम तज्ञ आणि नामांकित पशुवैद्यकीय डॉक्टर आपल्यासाठी डेअरी फार्मिंगचा एक कोर्स तयार करण्यासाठी एकत्र आले आहेत.
टेपलूचे ऑनलाइन अभ्यासक्रम आयव्हीआरआयने (IVRI) उद्योजकांसाठी फायदेशीर म्हणून ओळखले आहेत. IVRI (भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था), ही आशियातील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञानावरील प्रमुख संस्था आहे. अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा.
या ऑनलाइन कोर्समधून आपण काय शिकणार?
फायदेशीर डेअरी फार्म स्थापित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे ही एक कला आणि विज्ञान दोन्ही आहे. यशस्वी डेअरी फार्मने शेतकर्यांचे भविष्य बदलले आहे आणि वर्षानुवर्षे त्यांच्या संपत्ती मध्ये वाढ केली आहे. दुग्धव्यवसाय हा बहुतेकदा निसर्गाचा अनियमितपणा आणि खाद्य व चाऱ्याच्या किंमतींमधील चढ-उतार यांच्या अधीन असतो.
आजारांचा परिणाम फक्त जनावरांच्या आरोग्यावर होत नाही तर डेअरी फार्मचा नफा व जनावरांची उत्पादनक्षमता यांवरही होतो. दुग्धव्यवसायात शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शहरातील काही नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बरोबरीचे उत्पन्न आपल्याला आपल्या डेअरी फार्ममध्ये मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला उद्योजक बनण्याची संधी मिळते व आपण आपले स्वातंत्र्य उपभोगू शकतो.
दुग्धव्यवसायाच्या या ऑनलाइन अभ्यासक्रमामधून आपल्याला सर्वात महत्वाच्या अशा अकरा विषयांबद्दल शिकायला मिळेल. यामध्ये आपण आपला डेअरी फार्म यशस्वी करण्यासाठी विविध वैज्ञानिक प्रक्रिया व तंत्रज्ञान यांचा नियोजनपूर्वक वापर कसा करायचा हे शिकाल.
स्वच्छ दूध निर्मिती – अँटीबायोटिक व अफलाटोक्सिनमुक्त दूध कसे तयार करावे, त्याचबरोबर अजून काही तांत्रिक गोष्टी शिकून आपण विकत असलेल्या दुधाची किंमत वाढवून मिळवा.
दुधाळ जनावरांची निवड - आपल्या दुग्धव्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्तम जनावरांची खरेदी करण्याची कला व तांत्रिक माहिती शिका.
पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन - आपल्या गोठ्यामध्ये आजारांनी प्रवेश करू नये म्हणून दुभत्या जनावरमधील आजार व्यवस्थापन या विषयामध्ये स्वतःला परिपूर्ण बनवा.
दुभत्या जनावरांच्या गोठ्याची संरचना - यशस्वी गोठ्यांची रचना कशी असते हे शिका व विविध प्रकारच्या गोठ्यांचे नकाशे व आराखडा मिळवा.
वासरू व कालवडींचे व्यवस्थापन -“आजचे वासरू हे उद्याची गाय असते.” वासरू व कालवडींमध्ये शरीरवाढीचा चांगला दर मिळविण्यासाठी आणि पुनरुत्पादनात चांगली कामगिरी होण्यासाठी त्यांचे संगोपन कअसे करायचे हे शिका.
दुभत्या जनावरांचे पोषण – आपल्या डेअरी फार्ममधील नफा किंवा तोटा याचा आपण जनावरांना काय खायला देतो याच्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. आपला नफा वाढविण्यासाठी जनावरांना काय आहार द्यावा हे शिका.
जनावरांचे पोषण या विषयावरील प्रगत अभ्यासक्रम – आपल्या डेअरी फार्मसाठी स्वतःचे आहाराचे सूत्र बनविण्यास शिका. शास्त्रोक्त पद्धतीने चारा व खुराकाची निवड करणारा एक्का बना. व स्वतःचे टी एम आर बनविण्यास शिका.
पैदास आणि पुनरुत्पादन समस्या – चांगला गर्भधारणा दर मिळवण्याचा आणि दुग्धजन्य प्राण्यांची पुढची पिढी तयार करण्यामागील विज्ञान जाणून घ्या.
दुभत्या जनावरमधील स्तनदाह /मस्टायटीस – दुग्धव्यवसायामध्ये सर्वसामान्यत: सर्वात जास्त दिसून येणारा आजार ज्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. स्तनदाह किंवा मस्टायटीस हा आजार रोखण्याच्या तंत्रज्ञानात पारंगत व्हा.
रोग निदान आणि प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती – रोगाच्या यशस्वीपणे प्रतिबंधासाठी त्याची ओळख आणि वेळेवर निदान आवश्यक आहे. प्रयोगशाळेच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या जेणेकरून आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांद्वारे आपल्या प्राण्यांचे वेळेवर उपचार करू शकाल.
डेअरी फार्मचे व्यावसायिक नियोजन – यांत्रिक पद्धतीचा वापर, आपल्या गोठयातील नुकसान कसे कमी करावे. अर्थसहाय्य कसे मिळवावे. विक्री व विपणन व्यवस्था कशी असावी, आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यातूमच्या डेअरी फार्मला यशस्वी व्यवसायात रूपांतरित करतील, हे सर्व आपण या विषयांत शिकुया.
भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान - भ्रूण हस्तांतरण तंत्र हे एक ईटीटी तंत्र आहे ज्याद्वारे दाता मादी गायीकडून भ्रूण गोळा केले जातात आणि प्राप्तकर्त्या मादी गायीकडे हस्तांतरित केले जातात.तुमच्या डेअरी फार्म मध्ये उत्तम प्रजनन करण्यासाठी आणि डेअरी फार्मचा नफा वाढवण्यासाठी या ऑनलाइन अभ्यासक्रम मध्येसामील व्हा.
आपल्या प्रशिक्षकांना भेटा
डॉ. शैलेश शामराव मदने
फार्म व्यवस्थापन
नफ्यातील डेअरी फार्मचे व्यवस्थापन करण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड, यशस्वी डेअरी फार्म निर्माण करण्याचे मार्गदर्शन करण्याचा दहा वर्षांचा अनुभव, ते दूधउत्पादक शेतकऱ्यांना व कॉर्पोरेटस्नना सुद्धा प्रशिक्षण देतात. बीव्हीएससी व ए.एच. ही पदवी मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालयातून मिळवलेली आहे. GRMF पुरस्काराचे विजेते म्हणून त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कॉनेल विद्यापीठातील स्वच्छ दूध उत्पादन सेवा या विभागात 3 महीने अभ्यास केला आहे.
डॉ. मनीषा दिनेश भोसले
व्यवसाय नियोजन
व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा 10 वर्षांचा अनुभव. बी.एस्सी., बीएड, एमसीएम, एमबीए आणि त्यांनी डॉक्टरेटची पदवी घेतली आहे, तसेच त्यांनी पशुधन क्षेत्रातील कंपन्यांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. त्या सध्या तळागाळातील स्तरावर दुग्धव्यवसाय वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि बचतगटांना मदत करतात.
डॉ.टी.के.वल्ली
पशु पोषण
माजी विभाग प्रमुख, पोषण, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था (एनडीआरआय), करनाल.त्यांच्याकडे पशु पोषनातील डॉक्टरेटची पदवी आहे. त्यांच्याकडे 35 वर्षांहून अधिक संशोधन आणि अध्यापनाचा अनुभव आहे आणि त्यांच्या नावावर 200 हून अधिक संशोधन आणि इतर प्रकाशनांची नोंद आहे.
डॉ.मिलिंद केशव कुलकर्णी
जनावरांचे आरोग्य आणि वासरू व कालवडींचे व्यवस्थापन
“कुटुंबामधील पशूवैदयकांच्या सर्वाधिक पिढ्या” असे स्थान इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2019 मध्ये त्यांनी मिळवले आहे. त्यांना जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाचा 40 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी बीव्हीएससी व ए.एच. ही पदवी मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालय येथून संपादित केली. ते महाराष्ट्र शासनाचे माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.
डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी
रोग निदान आणि प्रयोगशाळा प्रक्रिया
ओमेगा लॅबोरेटरीजचे एमडी. बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये 8 वर्षांचा अध्यापनाचा अनुभवासह डायग्नोस्टिक्स आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये 22 वर्षांचा अनुभव. एमव्हीएससी. पॅथॉलॉजी, बॉम्बे वेटरनरी कॉलेज आणि पशुवैद्यकीय फार्माकोविजिलेन्समध्ये पीएचडी, त्यांच्या नावावर असंख्य संशोधन प्रकाशनांची नोंद आहे.
डॉ.के.एस.रामचंद्र
प्रगत पोषण
ते प्रख्यात पशूपोषण तज्ञ आहेत. त्याचबरोबर त्यांना संशोधक, नियोजक आणि धोरण अंमलबजावणी तज्ञ म्हणूनही अनुभव आहे. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनाल येथून पशूपोषणशास्त्र या विभागात पिएचडी ही पदवी घेतलेली आहे. ते भारतीय डेअरी संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत तसेच भारत सरकारचे तांत्रिक तज्ञ होते.
डॉ दिनेश तुकाराम भोसले
पशु पोषण
पशुधन क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव. त्यांनी शेतकर्यांसाठी 1000 हून अधिक सेमिनार आयोजित केले आहेत. मुंबई व्हेटरनरी कॉलेज, इथून एमव्हीएससी, बीव्हीएससी आणि एएच आणि भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) मधून पशु पोषण विषयावर डॉक्टरेट पदवी घेतली आहे. अनेक नामांकित राष्ट्रीय स्तरावरील उद्योग मंडळाचे सदस्य आणि त्यांना व्यवसायातील व्यापक अनुभव आहे.
डॉ. अतुल सुभाष फुले
पैदास आणि पुनरुत्पादनाची समस्या
शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आरोग्य सेवा प्रदान करणारा एक व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे 20 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी पशुधन क्षेत्रातील नामांकित संस्थांसोबत काम केले आहे आणि वर्षानुवर्षे असंख्य पशु आरोग्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी परभणी येथील पशुवैद्यकीय व पशु विज्ञान महाविद्यालयातून बीव्हीएससी व ए.एच.ची पदवी घेतली आहे.
डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या डेमो लिंकवर क्लिक करा
पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन
डेअरी पोषणाविषयी प्रगत अभ्यासक्रम
वासरे आणि कालवडींचे व्यवस्थापन
ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा
"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"
हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर आपण खालील गोष्टी करण्यास शिकाल:
- कोर्समधील कोणत्याही डिझाइनचा वापर करून आपले स्वतःचे डेअरी फार्म सुरु करू शकाल
- चांगल्या दुभत्या जनावरांची खरेदी करण्यास शिकल्यामुळे तुम्हाला चांगले दूध उत्पादन मिळेल व पुढील पिढी चांगली तयार होईल.
- आपल्या डेअरी फार्ममध्ये चांगल्या प्रतीचे अवशेषमुक्त दूध निर्माण करू शकाल. व बाजारात चांगला दर मिळवू शकाल.
- आपल्या पशुंना होणाऱ्या विविध रोगांना ओळखू शकाल आणि त्यांना प्रतिबंधित करू शकाल
- आपल्या डेअरी फार्ममध्ये वंशावळीचे चांगले धोरण राबवू शकाल व ‘वर्षाकाठी एक वासरू’ मिळवू शकाल.
- आपल्या पशूंना योग्य प्रकारचे खाद्य व चारा देऊ शकाल जेणेकरुन आपला खर्च कमी होईल आणि नफा वाढेल
- पशूंची विण्याच्या अगोदरची व नंतरची चांगली काळजी घेऊ शकाल आणि दुधाचे उत्पादन व पुनरुत्पादन कार्यक्षमता वाढवू शकाल.
- आपल्या गोठयातील वासरांना व कालवडींना जास्त दूध देणारी दुभती जनावरे बनवू शकाल.
- आपल्या पशूंमधील समस्या ओळखणे आणि सर्वोत्तम निराकरणासाठी वेळेत आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना कॉल करणे
- आपल्या उत्पादनांची चांगली किंमत मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या विपणन तंत्राचा वापर करणे
- आपल्या गोठ्याचे सर्वेक्षण करून आपण योग्य तंत्रज्ञानाप्रमाणे काम करत आहोत का? हे तपासायला शिकाल.
- आपल्या डेअरी फार्मचे आर्थिक नियोजन करू शकाल व आपल्या व्यवसायातील नफा वाढवू शकाल.
"यशस्वी डेअरी फार्म सुरु करण्यात मदत करण्यासाठी संपूर्ण माहिती"
"यशस्वी डेअरी फार्मचे व्यवस्थापन करण्यास मदत करनारी परिपूर्ण माहिती"
आमचे वर्तमान उपयोगकर्ते काय म्हणतात?
हा कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळेल
Courses Included with Purchase
Original Price of Bundled Course after Discount: ₹7,389
अभ्यासक्रमाची किमंत ४९९९ रू. सवलतीसह.
(वर दिलेले सर्व अभ्यासक्रम ए-टू-झेड कोर्समध्ये समाविष्ट आहे)