पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन

आपल्या दुभत्या जनावरांशी निगडीत आजार व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक तंत्राची माहिती घेऊन स्वतःला सुसज्ज ठेवा. शेवटी उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

डेअरी व्यवसायामध्ये आर्थिक नुकसानीचा फटका बसण्याचे प्रमुख कारण कोणते आहे? होय, आपण बरोबर ओळखलंत. दुभत्या जनावरांना वेळोवेळी भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारी हा या व्यवसायातील बऱ्याच शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय आहे. आपल्यापैकी कोणाचीच इच्छा नसते की आपल्या गोठयातील पशूने आजाराच्या तोंडघशी पडावे. परंतु; हे विविध आजार आपल्या गोठ्यामध्ये शिरताना आपल्या परवानगीची वाट पाहत नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे.

काहीवेळा असेही घडते की आपल्याशेजारी असणाऱ्या डेअरी फार्ममध्ये खरेदी करून काही नवीन जनावरे आणली जातात ज्यांना एखाद्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली असू शकते. आपल्या नकळत हे संसर्गजन्य आजार आपल्या डेअरी फार्ममध्ये शिरकाव करून आपल्या पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम नक्कीच घडवून आणू शकतात.

काही आजारांमुळे दुभत्या पशूंमध्ये गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येऊ शकते तसेच त्यांच्या दूधउत्पादन आणि पुनरुत्पादन क्षमतेवर कायमचा परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपला दूध व्यवसायाशी संबंध येतो, त्यावेळी आपल्याला या सर्व आजारांची माहिती आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या पशूंवर वेळीच उपचार कराल.

आपणाला जर अशा प्रकारचे आजार आणि हे आजार उद्भवण्याची कारणे माहिती असतील तर आपण तत्परतेने हवी असलेली सर्व पावले उचलून आपल्या जनावरांना अशा आजारांपासून दूर ठेवणे शक्य होते. टेप्लू मध्ये, आम्हाला विश्वास आहे की डेअरी व्यवसायामध्ये तेच शेतकरी सर्वात यशस्वी झालेले आहेत ज्यांनी आजारांवर उपचार करण्यात वेळ खर्ची न घालता आजारांपासून आपला डेअरी फार्म दूर कसा ठेवता येईल यावर भर दिला.

सर्वात अनुभवी पशूवैद्यकीय डॉक्टर्स तसेच या क्षेत्रातील नामांकित तज्ञ यांचे या विषयात असणारे त्यांचेज्ञान एकत्रित करून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ‘पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन’ हा अनोखा कोर्स. आपल्या फार्ममध्ये रोगांना शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी तसेच आपल्या फार्मचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा ऑनलाइन कोर्स नक्की जॉइन करा.

भेटा आपल्या प्रशिक्षकांना


Your Instructor


डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी
डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी

डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी हे Bvsc. & AH या पदवीचे तज्ञ असून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या क्षेत्रामध्ये त्यांचा 37 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रतिष्ठित अशा इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस 2019 मध्ये त्यांनी “फॅमिली विथ मोस्ट जनरेशन्स ऑफ वेटर्नरी डॉक्टर्स” अशा गौरवोद्गारांसह मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या घराण्यातील सलग चार पिढ्या 1918 ते 2018 या कालखंडामध्ये पशूवैद्यकीय तज्ञ म्हणून कार्यरत राहिलेल्या आहेत.

ते दुभत्या जनावरांमधील आरोग्यविषयक समस्या व आजार व्यवस्थापन या क्षेत्रामधील विशेष तज्ञ असून त्यांचा या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बऱ्याच पॉलीक्लिनिकसाठी पशुधन विकास अधिकारी म्हणून काम पाहिले असून गेली कित्येक वर्षे हजारो पशूंवर त्यांनी उपचार केले आहेत. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत याठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असताना डेअरी फार्मशी संलग्न असणाऱ्या असंख्य व्यवहारीक अडचणींचा तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सखोल मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत केली आहे.


या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


या कोर्सची आपल्याला कशा प्रकारे मदत होईल?

या कोर्सची रचना अशा प्रकारे करण्यात आलेली आहे ज्यायोगे आपल्या डेअरी फार्ममध्ये दैनंदिन कामकाज पाहत असतानाच पशूंच्या आजारांची सर्वसाधारण कारणे लक्षात ठेवण्यास मदत होईल. आपला विद्यमान डेअरी फार्म असु दया किंवा आपण नव्याने हा उद्योग चालू करण्याचा विचार करत असू द्या, पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन या विषयावरील तयार केलेला हा कोर्स नक्कीच आपल्या खूप कामी येईल. विडिओचा आधार घेऊन तयार केलेल्या या कोर्सद्वारे आपणाला दुभत्या पशूंमध्ये उद्भवू शकणाऱ्या विविध आजारांची ओळख आणि हे आजार होण्यामागची कारणे यांची परिपूर्ण माहिती मिळेल. आपल्या फार्ममधील पशूंना या आजारांपासून आपण दूर कसे ठेवावे याबाबत आपणास पूर्णपणे प्रशिक्षित केले जाईल.

आजारांशी संबंधित सर्वसाधारण लक्षणे कोणती असू शकतात याबद्दल आपणास जागरूक केले जाईल ज्यामुळे आपल्या फार्ममध्ये त्याचा प्रादुर्भाव होताच आपण लगेच ते ओळखू शकाल. या माहितीचा आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून या आजारांचे संक्रमण इतर पशूंना होऊ नये यांची काळजी आपण घ्यायला शिकाल.

आपल्या फार्ममधील एखादे जनावर जेव्हा आजारी पडते तेव्हा साहजिकच त्याच्या दूध उत्पादनात घट होते. पशू जर गाभण असेल तर गर्भपात होण्याचा धोका असतोच, अशावेळी त्यांच्या शारीरिक स्थितीवर याचा निश्चित विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आपणाला उद्भवलेली समस्या ओळखता यायला हवी आणि या समस्याचे निदान व निराकरण करण्यासाठी चांगल्या पशूवैद्यकीय डॉक्टरची मदत घ्यायला हवी. परंतु; अशावेळी डॉक्टर आपल्या डेअरी फार्ममध्ये येईपर्यंत दरम्यानच्या काळात आपल्याला प्रथमोपचार पद्धतींचा अवलंब करून परिस्थिती हातळता येणे गरजेचे असते. या प्रकरणांमधून अशा परिस्थितीवेळी समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत आपणाला परिपूर्ण बनवले जाईल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum


  पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन
Available in days
days after you enroll
  गंभीर संसर्गजन्य आजार ज्यांच्या बाबतीत आपण सतर्क राहणे गरजेचे आहे
Available in days
days after you enroll
  दगडी किंवा मस्टायटीस या आजारावर आपण कसे नियंत्रण करू शकतो ?
Available in days
days after you enroll
  वासरांमधील आरोग्यविषयक प्रक्रिया व आजार
Available in days
days after you enroll


पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन या विषयावरील हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील बाबींमध्ये सक्षम बनाल:

  • आपल्या दुभत्या जनावरांवर परिणाम करणाऱ्या एफएमडी, ब्रूसेलोसिस इ. सारख्या संसर्गजन्य आजारांपासून आपला डेअरी फार्म सुरक्षित ठेवा.
  • पशूंच्या कासेमध्ये होणाऱ्या लागणीमुळे उद्भवणाऱ्या स्तनदाहसारख्या विकारांना नियंत्रित ठेवा आणि दूध उत्पन्नात वाढ करा.
  • गोठ्यात असणाऱ्या गोचीड आणि माशीवर नियंत्रण मिळवून त्यांच्याद्वारे पसरू शकणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवा.
  • दुभत्या पशूंच्या प्रजनन-संबंधी निगडीत समस्या ओळखून योग्य काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या.
  • सदोष आहारप्रणालीशी निगडीत आरोग्य संबंधित समस्या ओळखून त्यावर सुधारात्मक कार्यवाही करा.
  • आपल्या फार्ममध्ये पशूंच्या आरोग्याशी संबंधित वैज्ञानिक व्यवस्थापन प्रक्रियांचा अवलंब करा.
  • दुभत्या पशूंमध्ये खनिज कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची ओळख करून घ्या.
  • कोणत्याही प्रकारच्या इजा होऊ न देता आपल्या फार्ममध्ये कालवडींचे संगोपन करा.
  • उपचारांवरील होणारा खर्च करून आपल्या फार्मच्या एकूण उत्पन्नात वाढ होते.

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.