दगडी पासून मिळवा मुक्ती

आपल्या डेअरी फार्ममधून कासेच्या दाहचे निर्मूलन कसे करावे आणि दूध उत्पन्नात भरघोस वाढ कशी मिळवावी हे शिका.

   Watch Promo

हा कोर्स आपल्याला मोफत देत आहोत

मस्टायटीस किंवा स्तनदाह यामध्ये पशूच्या कासेमध्ये सूज निर्माण होते. पशूंच्या सडामधून याचे जिवाणू कासेमध्ये शिरकाव करतात. आमच्याशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांपैकी सचिन एक आहेत ज्यांच्याकडे 20 गायींचा गोठा आहे. एके दिवशी, त्यांना असे आढळून आले की आपल्या गायींपैकी एका गायीच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट जाणवत आहे. त्यांना या समस्येचे कारण सापडत नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी अजून दोन गायींमध्ये अशाच प्रकारे अचानक दुधात घट जाणवू लागली. आता मात्र त्यांनी त्या गायींना पुढील काही दिवस बारीक देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्यांना असे दिसून आले की एका गायीचे दूध पाण्यासारखे पातळ येत आहे तर दुसऱ्या दोन गायींच्या दुधामध्ये उष्णता जाणवत आहे. अजून खोलात गेल्यानंतर, सचिन यांच्या असे लक्षात आले की हे खराब दूध सगळ्याच सडामधून न येता ठराविकच सडामधून येत आहे.

या प्रकारानंतर बरेच दिवस झाले तरी सचिन यांना यामागचे कारण समजायला मार्ग नव्हता. यादरम्यान, त्यांना या तीन गायींपासून मिळणाऱ्या दुधामध्ये 30 टक्क्यांपर्यंत फटका बसू लागला. त्यांना हे निकृष्ट दर्जाचे दूध ओतून द्यायची वेळ येऊ लागली कारण ग्राहक गुणवत्ता नसलेले दूध घेण्यास नकार देऊ लागले. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नात त्यांना 30 टक्क्यांपर्यंत तोटा बसू लागला. केवळ दूध देणाऱ्या गायीच नाही तर आता पैलारु कालवडी ज्या प्रथमच व्यायल्या आहेत त्यांच्यामध्येदेखील अशीच लक्षणे दिसू लागली. बऱ्याच डेअरी फार्मची ही साधारण अशीच समस्या असते. बहुतेकवेळा पशूंच्या कासेमध्ये जिवाणूंचा शिरकाव होऊन प्रादुर्भाव झाल्यामुळे मस्टायटीस किंवा स्तनदाह या विकाराचा सामना करावा लागतो.

सचिन यांनी जेव्हा टेप्लूला मार्गदर्शनासाठी भेट दिली, तेव्हा आम्ही त्यांना स्तनदाहाचे प्रकार आणि त्यांची कारणे याबद्दल विस्तृत माहिती दिली. या आजारावर उपलब्ध असलेल्या शास्त्रीय प्रक्रियेचा आणि उपचारपद्धतीचा त्यांनी टप्प्याटप्प्याने अभ्यास केला ज्यामुळे आपल्या फार्ममध्ये आपण स्तनदाहावर मात करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. आमचा वैज्ञानिक दृष्टिकोण हा जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यावर तसेच लागण झालेल्या पशूंना पुन्हा स्तनदाह समस्या जडणार नाही यावर केंद्रित आहे. आमचे या क्षेत्रातील तज्ञ तसेच उच्च संस्थांशी संलग्न राहून स्तनदाह आणि अशाच निगडीत आजारांच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

टेप्लूमध्ये, पशूंच्या स्तनदाहाच्या समस्येला कशा प्रकारे प्रतिबंधित करावे आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे हे शिकवणाऱ्या विडियो प्रणालीवर आधारित अनोख्या कोर्सची रचना केलेली आहे. कित्येक वर्षांचा प्रात्यक्षिक अनुभव आणि तज्ञांचे या विषयातील बहुमूल्य ज्ञान तसेच प्रगतिशील शेतकरी यांचा एकत्रित मिलाप करून हा कोर्स तयार झाला आहे. स्तनदाहावर नियंत्रण मिळवून आणि आपल्या डेअरीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ मिळवून सचिन यांनी या व्यवसायात आगेकूच केली आहे. आता वेळ आपली आहे.

भेटा आपल्या प्रशिक्षकांना


Your Instructor


डॉ. शैलेश श्यामराव मदने
डॉ. शैलेश श्यामराव मदने

डॉ. शैलेश श्यामराव मदने हे बी. व्ही. एससी. & ए. एच. या विषयांमध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षण बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, मुंबई येथून घेतले आहे. नामांकित पशुसंवर्धन सल्लागार असणारे डॉ. शैलेश मदने यांना संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. आजतागायत त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्वच्छ, अंशरहित दूध उत्पादन व्यवसाय सुरु करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. दुभत्या पशूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय हा आर्थिक लाभ देणारा कसा राहील यावर त्यांचा नेहमीच जोर राहिला आहे. आजपर्यंत अशा असंख्य शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देऊन या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी मदत केली आहे.

पशुसंवर्धन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचे कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करतात . जीआरएमएफ पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.शैलेश मदने यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन सेवा प्रयोगशाळेत 3 महिने अभ्यास केला आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे विस्तार तज्ञ म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.


या कोर्सची आपल्याला कशा प्रकारे मदत होईल?

आपण दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी, प्रशिक्षक किंवा डेअरी उद्योगातील व्यावसायिक कामगार यापैकी कोणीही एक असाल तर स्तनदाह यावर आधारित असणारा हा कोर्स आपल्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. स्तनदाह ही डेअरी फार्ममधील एक सामान्य आणि तेवढीच गंभीर समस्या आहे. स्तनदाहावर नियंत्रण कसे करावे आणि त्याला आपल्या डेअरी फार्मपासून दूर कसे ठेवावे याबाबत आपणाला प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव मिळाल्यानंतर आपण नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक टप्प्यावरती याचा उपयोग करून घ्याल.

या कोर्समध्ये प्रत्यक्षात डेअरी फार्मवर रेकॉर्ड केलेल्या विडियोजच्या माध्यमातून आपणाला समस्या आणि त्यावरील समाधान या तत्त्वावर प्रात्याक्षिकासह शिकवले जाते, त्यामुळे आपणाला स्थानिक पातळीवर समस्यांचे निराकरण करण्याचा खरा अनुभव मिळतो. आमची निर्माती टीम आपला बराच वेळ प्रवास करून, वेगवेगळ्या भागातील डेअरी फार्मला भेटी देऊन आणि तेथील विडियो रेकॉर्ड करून आपणाला या सर्व गोष्टी घरबसल्या शिकण्याचा अनुभव देण्यास तत्पर आहेत. चित्रांसाहित डिजिटल प्रणालीचा वापर केल्यामुळे आपणाला या आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपचारपद्धती लक्षात ठेवणे सहजसोपे जाईल हे नक्की.

या अभ्यासक्रमातील घटक आणि त्याची मांडणी आम्ही इतक्या सहज आणि सुटसुटीत ठेवली आहे की अगदी सामान्य ज्ञान आणि कौशल्य असलेला 10 वर्षाचे मूलदेखील हा अभ्यासक्रम शिकून त्याची अंमलबजावणी फार्ममध्ये करू शकेल. हा कोर्स आपणाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय स्तनदाह नियंत्रित कसा ठेवावा आणि दूध उत्पादन कसे वाढवावे याचे तंत्र शिकवतो. यासाठी आवश्यक असणारी बरीच सामग्री स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने घरबसल्या आपणाला हे सर्व शिकता येईल.

हा कोर्स आपणाला स्तनदाहवर नियंत्रण ठेवण्यास आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्यास तर मदत करेलच, पण त्याशिवाय आपण आपल्या डेअरी उद्योगात किंवा व्यवसायात एक ठोस वैज्ञानिक पाया या कोर्सच्या सहाय्याने निर्माण करू शकाल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum




स्तनदाहचे व्यवस्थापनहा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील बाबींमध्ये सक्षम बनाल:

स्तनदाहची लक्षणे ओळखणे

पैलारु कालवडींना स्तनदाह होण्यापासून सुरक्षित ठेवणे

भाकड पशूंमध्ये होणाऱ्या स्तनदाहवर नियंत्रण मिळवणे

दुभत्या पशूंमध्ये स्तनदाह उद्भवू न देणे

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि आणि कधीच संपत नाही !!!
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
आयुष्यातला आवाज कसा येतो? नोंदणी केल्यावर, आपल्याला आवडत असलेल्या या कोर्सपर्यंत आपल्याकडे अमर्यादित प्रवेश आहे - कोणत्याही आणि आपल्या मालकीच्या सर्व डिव्हाइसेसवर.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

हा कोर्स आपल्याला मोफत देत आहोत

Get started now!