स्वच्छ दूध निर्मिती

उच्च दर्जाचे प्रतिजैविके विरहित आणि अपायकारक घटकमुक्त दुधाची निर्मिती कशी करावी शिकणे

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

आपल्या कुटुंबासाठी व ग्राहकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची निर्मिती करणे हेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्य ध्येय असले पाहिजे. स्वच्छ दूध म्हणजे ते केवळ आरोग्यदायीच नव्हे तर त्यामध्ये प्रतिजैविके,अफ़्लाटॉक्सिन, कीटकनाशके इ. सारख्या अपायकारक घटकांचा अंतर्भाव असता कामा नये. मानवी आरोग्यास इजा पोचवणाऱ्या विविध प्रतिजैविकांचा अंश, विषारी द्रव्यांचे दुधामधील प्रमाण किंवा दुधामधील भेसळ इ. घटकांपासून आपल्या दुधाचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजकाल समाजघटकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये याच मुद्द्यांवर जनजागृती होत असल्याने पुढे जाऊन स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची मागणी बाजारात जोर धरणार आहे हे नक्की.

दुधाच्या गुणवत्तेवर विशेष भर देणारे शेतकरी तसेच व्यावसायिक या उद्योगात नेहमीच अग्रेसर राहून यशस्वीरीत्या आज प्रगतीपथावर आहेत. त्यांनी वेळोवेळी उच्च प्रतीच्या दुधाची निर्मिती करण्यावर भर दिला. व ते आपल्या जनावरांसाठी विविध कल्याणकारी प्रयोग राबवून आपल्या दुधाचे बाजारामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करण्यात आज यशस्वी होताना पहायला मिळत आहेत. अफ़्लाटॉक्सिन सारखे विषारी अंश विविध मार्गांनी दुभत्या जनावरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये शिरतात जिथून ते आहे तसे दुधामध्ये उतरतात. हे किंवा यासारखे घटक हे केवळ मानवी आरोग्यासाठीच नव्हे तर ते आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत हानिकारक आहेत. संशोधनाअंती असे आढळून आहे कि ज्या दुभत्या जनावरांच्या चाऱ्यात अफ़्लाटॉक्सिन विषद्रव्याचा अंश आढळून आलेला आहे त्या जनावरांच्या दूध उत्पादनात 25 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

त्यामुळे जर आपणदेखील असे शेतकरी किंवा दूध उत्पादक व्यावसायिक असाल जे आपल्या जनावरांच्या बाबतीत वेळोवेळी सर्व प्रकारची काळजी घेत आहेत परंतु तरीदेखील आपणास म्हणावे तसे दूध उत्पादन मिळत नाही उलटपक्षी जनावरांच्या विविध प्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर याचे मुख्य कारण म्हणजे विविध मार्गांनी त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या विषारी घटकांचा शिरकाव होय.

टेप्लू मध्ये आम्ही हेच मुद्दे समोर ठेऊन स्वच्छ दूध उत्पादन हा ऑनलाइन कोर्स आपल्याकरिता तयार केला आहे. दूध व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वोत्तम तज्ज्ञांची मदत हा कोर्स तयार करतेवेळी घेतली असून चित्रफितींद्वारे सर्व व्यावहारिक आणि वैज्ञानिक तंत्रांची माहिती उलघडून सांगितली आहे.

भेटा आपल्या प्रशिक्षकांना


Your Instructor


डॉ. शैलेश श्यामराव मदने
डॉ. शैलेश श्यामराव मदने

डॉ. शैलेश श्यामराव मदने हे बी. व्ही. एससी. & ए. एच. या विषयांमध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षण बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, मुंबई येथून घेतले आहे. नामांकित पशुसंवर्धन सल्लागार असणारे डॉ. शैलेश मदने यांना संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. आजतागायत त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्वच्छ, अंशरहित दूध उत्पादन व्यवसाय सुरु करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. दुभत्या पशूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय हा आर्थिक लाभ देणारा कसा राहील यावर त्यांचा नेहमीच जोर राहिला आहे. आजपर्यंत अशा असंख्य शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देऊन या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी मदत केली आहे.

पशुसंवर्धन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचे कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करतात . जीआरएमएफ पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.शैलेश मदने यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन सेवा प्रयोगशाळेत 3 महिने अभ्यास केला आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे विस्तार तज्ञ म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.


या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


हा कोर्स कशाप्रकारे आपणास मदत करेल?

आपण शेतकरी असाल किंवा दूध संकलन संस्था, स्वच्छ दूध उत्पादन हा कोर्स आपणास विविध समस्यांचे निराकरण करण्यात नक्कीच मदत करेल. दूध उत्पादन शेतकरी म्हणून आपण उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या दुधाची निर्मिती करणाऱ्या सर्व वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास कराल. तयार होणारे दूध हे प्रतिजैविके, अफ़्लाटॉक्सिन, कीटकनाशके किंवा इतर अवशेष मुक्त कसे करता येईल हे जाणून घ्याल. जिवाणूंची संख्या आणि कायिक पेशींची संख्या कमी असणाऱ्या दूध निर्मितीचे तंत्र आपण या माध्यमातून शिकाल. याद्वारे आपणास दर्जेदार दुधाचा कालावधी कसा वाढवावा यासोबतच आपल्या दुधाला चांगली किंमत कशी मिळवावी याची देखील माहिती मिळेल.

जर आपण दूध संकलन संस्था चालवत असाल आणि स्वच्छ, भेसळविरहित दुधाची खरेदी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर आपणास दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परिपूर्ण कोर्स तयार केलेला आहे. या कोर्ससाठी आपणास शक्य असेल तेवढ्या शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता, तज्ज्ञांच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतींचे प्रशिक्षण देऊ शकता. डिजिटल पद्धतीने त्यांच्या प्रगतीचे परीक्षण करा आणि स्वच्छ दुधासाठी आणि त्या संदर्भात प्रशिक्षण देण्याकरता प्रोत्साहनपर ऑफर देऊ करा.

आपल्याला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढवून आपल्या दूध संकलनात वाढ करायची असल्यास आमचे डिजिटल व्यासपीठ हा आपल्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. आमच्या डिजिटल व्यासपीठाची मदत घेऊन आपण असंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करू शकता मग ते कोणत्याही ठिकाणी राहत असतील. या कोर्सच्या माध्यमातून आमचे तज्ज्ञ हे आपल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरता उपलब्ध असतील. शेतकरी आपल्या मोबाईलचा वापर करून हा कोर्स अभ्यासू शकतात.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum


  या कोर्समधून आपण काय शिकणार?
Available in days
days after you enroll
  दूधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नफ्यात वाढ करण्यासाठी यशस्वी दुध काढन्याची पद्धत
Available in days
days after you enroll


स्वच्छ दूध निर्मितीवर आधारित या कोर्समध्ये आपल्याकरिता खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे:

  • अपायकारक घटकांमुळे दुधाच्या गुणवत्तेवर आणि दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याबद्दल इत्यंभूत माहिती
  • दुभत्या जनावरांच्या शरीरसंस्थेत प्रवेश करणाऱ्या विषारी घटकांचे स्रोत ओळखून त्यांचा वेळीच बंदोबस्त कसा करावा.
  • जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या कासेच्या दाहसारख्या आरोग्यविषयक समस्या निवारण तसेच त्यांची प्रजनक्षमता सुधारण्यावर विशेष भर.
  • जिवाणूंची संख्या आणि कायिक पेशींची संख्या कमी असणाऱ्या दूध उत्पादनावर भर.
  • निर्धारित लक्ष्यानुसार प्रतिजैविके आणि अफ़्लाटॉक्सिन यांची पातळी राखण्याचे नियोजन.
  • जागतिक पद्धती आणि प्रचलित दूध उत्पादनाचे तंत्र यांची योग्य सांगड.
  • जनावरांच्या उपचारांवरील खर्च कमी करून आपल्या दुग्ध व्यवसायातील उत्पन्नात भरघोस वाढ

सदिच्छा "हा एक उत्कृष्ट कोर्स आहे नक्कीच तपासून पहा !"

नीरज पारिक - संस्थापक, उमानंद डेअरी, १०० दुभती जनावरे आहेत.


जर आपण दूध संकलन संस्था, खाजगी डेअरी, स्वयंसेवी संस्था, सहकारी डेअरी किंवा कंपनीशी निगडित असाल आणि आपणास आमच्या डिजिटल कोर्सच्या माध्यमातून "स्वच्छ दूध उत्पादन" या विषयावर असंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायचे असल्यास आम्हाला [email protected] यावर नक्की कळवा.

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.