रोग निदान आणि प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती

आपला शेती नफा कमी होण्यापासून रोग थांबवा. त्यांचे निदान कसे करावे आणि वेळेवर उपचार कसे मिळवावे ते शिका

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

रोगांना आपल्या फार्मातील नफा कमी करण्यापासून थांबवा. त्यांचे निदान कसे करावे आणि वेळेवर उपचार कसे मिळवावे ते शिकाल

यशस्वी दुग्धशाळेतील शेतकरी सर्व प्रकारची काळजी घेतात आणि याची सुनिश्चिती करतात कि पशूंच्या अनेक प्रकारचे रोग त्यांच्या फार्मपासून दूर कसे राहतील. दुग्धजन्य पशु आजारी पडतात तेव्हा डेअरी फार्मात दोन मुख्य तोटे होतात एक म्हणजे दुधाचे उत्पन्न कमी होते आणि दुसरे म्हणजे पशूंच्या शरीराच्या एकूण स्थितीवर परिणाम होतो ज्यामुळे प्रजनन कार्यक्षमता कमी होते.

आपण ती म्हण ऐकली असेल “उपचारापेक्षा काळजी घेतलेली बरी”, नफा कमावणारे डेअरी शेतकरी, त्यांच्या पशूंना कोणताही रोग होऊ नये म्हणून आवश्यक सर्व पावले उचलतात. अशी एक पद्धत म्हणजे खोलवर रुजलेल्या आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी निदान आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या करणे. प्रयोगशाळेतील चाचण्या आपल्याला आपल्या फार्मात या आजारांना पुन्हा पुन्हा येण्यापासून बचाव करण्यास मदत करतील. कधीकधी पशु आजारी पडतात आणि आपल्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांचे उपचार करावे लागतात. प्रयोगशाळेच्या काही चाचण्यांमुळे डॉक्टरांना पशुंवर उपचार करणे सोपे होते.

आपल्या दुग्धजन्य प्राण्यांना होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान सुसज्ज करण्यासाठी टेप्लू येथे आम्ही “रोग निदान आणि प्रयोगशाळा प्रक्रिया” हा एक प्रकारचा कोर्स तयार केला आहे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांविषयी जाणून घेणे आणि रोगांचा सामना करण्यासाठी कटिंग एज टूल म्हणून त्याचा वापर करणे.

आपल्या प्रशिक्षकांना भेटा


Your Instructor


डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी
डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी

डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी हे बीव्हीएससी आणि एएच व्यावसायिक आहेत आणि त्यांनी मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजीमधून एमव्हीएससीची पदवी घेतलेली आहे. 22 वर्षांच्या कामाचा अनुभव असलेल्या डॉ. सूर्यवंशी यांनी पशुवैद्यकीय फार्माकोविलन्समध्ये डॉक्टरेट केलेले आहे. बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, त्यांनी 8 वर्षे शिकाऊ पशुवैद्यकीय डॉक्टर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर्सला शिकविले.

ओमेगा लॅबोरेटरीजचे संचालक म्हणून त्यांनी 2,50,000 हून अधिक रक्ताचे नमुने तपासले आणि पाळीव प्राणांचे 13500 पेक्षा अधिक पोस्टमार्टम्स केले आहेत. मागील 14 वर्षांमध्ये, त्यांनी पशुवैद्यकीय उत्पादने आणि न्यूट्रस्यूट्रिकलच्या असंख्य क्लिनिकल आणि कार्यक्षमता चाचण्या देखील केल्या आहेत. त्यांच्या नावावर 176 पेक्षा जास्त प्रकाशनांची नोंद आहे ज्यातील 15 प्रकाशने हे आंतरराष्ट्रीय प्रकाशने आहेत. असंख्य प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त डॉ. सूर्यवंशी हे असोसिएशन ऑफ वेटरनरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, महाराष्ट्रचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष देखील आहेत.


या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


हा कोर्स आपल्याला कशी मदत करू शकेल?

आपल्याकडे वर्तमान मध्ये डेअरी फार्म आहे का किंवा आपण नवीन फार्म सुरू इच्छित असाल तर, रोग निदान आणि प्रयोगशाळा प्रक्रियेचा हा कोर्स आपल्याला खूप मदत करेल.जेव्हा आपल्याला विविध प्रकारच्या रोगांसाठी आवश्यक असलेल्या चाचण्यांबद्दल माहिती असेल तेव्हा आपण त्यांचे लवकर निदान करण्यात आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांना पशुंवर वेळेवर उपचार करण्यास मदत करू शकाल. कधीकधी संसर्गजन्य रोगांमुळे दुग्धजन्य प्राण्यांच्या जीवितास धोका असतो. रोगजनकांच्या अचूक शोधामुळे त्यांचे प्राण वाचू शकतात.

आपण विविध प्रकारच्या चाचण्या शिकाल, स्तनदाह सारख्या सामान्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास आणि आपल्या दुधाची गुणवत्ता नियंत्रणात मदत होईल. या चाचण्यांमुळे आपल्या फार्मात उत्पादित दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यात आणि फार्मातील नफा वाढवण्यास मदत होईल.

काही संसर्गजन्य रोग प्राण्यांसोबत मनुष्याला देखील प्रभावित करतात. जर आपण अशा चाचण्यांबद्दल शिकल्यास ज्यामुळे आपल्या प्राण्यांना होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यास मदत होईल, तर आपण इतर प्राण्यांच्या आरोग्य सोबत आणि आपल्या फार्मातील लोकांच्या सुरक्षिततेबद्दल देखील खात्री बाळगू शकाल.

डेअरी फार्म सुरू करताना आपल्याला आपल्या शेतातील माती, पाणी, खाद्य आणि चाऱ्याच्या स्थितीची माहित असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्याला पशु खरेदी करण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या चाचण्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या फार्मात आजारी पशु खरेदी करू नयेत. ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे दूध देण्यासाठी आपल्याला दुधाच्या दर्जेदार चाचण्यांविषयी माहित असणे आवश्यक आहे जसे की अँटीबायोटिक आणि अफलाटोक्सिन अवशेषांची चाचणी, सोमॅटिक सेलची संख्या, भेसळ इ.चाचण्या.

हा कोर्स आपल्याला अशा प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण ज्ञानाने सुसज्ज करेल, तसेच चाचण्यांसाठी नमुने कसे घ्यावेत याबद्दल देखील सांगेल. आपण लसीकरण आणि पशूंच्या शवविच्छेदनाबद्दल देखील शिकाल. थोडक्यात, हा कोर्स आपल्याला आपल्या पशूंच्या आरोग्याशी संबंधित खर्च कमी करण्यास आणि आपला नफा वाढविण्यात मदत करेल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum


  डेरी फॉर्ममधील रोग निदान व प्रयोगशाळेतील प्रक्रिया
Available in days
days after you enroll
  प्रयोगशाळेतील चाचण्या ज्यांच्याबद्दल आपणास माहिती असणे आवश्यक आहे
Available in days
days after you enroll


रोग निदान आणि प्रयोगशाळेच्या प्रक्रियेचा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, आपण करण्यात सक्षम असावे:

1. आपल्या फार्मात स्तनदाह सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकाल

2. आपल्या पशूंना होणाऱ्या संसर्गजन्य रोगांना रोखू शकाल

3. निरोगी पशु खरेदी करू शकाल

4. जर आपल्या फार्मात एखाद्या पशुचा मृत्यू झाला तर अधिक पशूंच्या मृत्यूला रोखू शकला

5. आपल्यात शेतात चांगल्या प्रकारच्या खाद्याचे आणि चाऱ्याचे उत्पादन घेऊ शकाल

6. आपले दूध उच्च गुणवत्तेचे आहे किंवा नाही ते जाणून शकाल आणि प्रीमियम किंमत मिळविण्यासाठी ब्रँडिंग करू शकाल

7. चाचण्यांचे महत्त्व जाणून घ्याल ज्या डेअरी फार्म्ससाठी दुर्लक्षित विषय आहे.

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.