दुभत्या जनावरांचे पोषण

आरोग्य सुधारण्यासाठी आहार देया नफा सुधारण्यासाठी आहार देया

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

डेअरी व्यवसायामधून अधिक चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवणे आपल्या दुभत्या पशूंचे पोषणशास्त्र म्हणजेच आपण त्यांना आहारामध्ये काय देतो यावर बहुतांशी अवलंबून असते. असे बऱ्याच प्रमाणात डेअरी फार्म्स बंद करण्याची वेळ आली कारण त्यांना पशूंच्या पोषण-आहाराचे शास्त्रशुद्ध तंत्र माहीत नव्हते. दुभत्या जनावरांच्या आहार आणि चाऱ्यावर त्यांनी बराच खर्च केला ज्याचा परतावादेखील त्यांना मिळवता आला नाही.

डेअरी व्यवसायामध्ये व्यवस्थापकीय नियोजनाची आखणी करत असताना, पशूंचा आहार आणि चारा हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत. किंबहुना, आपल्या फार्ममध्ये अगदी 2 -3 जनावरेदेखील असतील तरी त्यांचे संगोपन करताना आपला दृष्टिकोण हा व्यावसायिक स्वरूपाचा राहीला पाहिजे. आपल्या फार्ममध्ये पशूंची संख्या मोठी असेल, आणि कालवडी व गायी यांच्या दूध देण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण त्यांना एकसमान आहार आणि चारा देत असू तर हा मुद्दा चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यात सगळ्यात मोठा अडथळा असू शकतो. अशा प्रसंगी, पशूंना त्यांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त आहार देण्यात आल्यास हे त्यांच्यासाठी विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे.

डेअरी व्यवसाय चालवत असताना या व्यवसायाशी निगडीत विविध घटकांचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आहार आणि चारा किंवा पशूंचे पोषणशास्त्र हा त्या मूलभूत घटकांमध्ये सर्वात महत्वाचा घटक होय. दैनंदिन आहारामध्ये अचानक झालेला बदल हा पशूंच्या पोटातील व ओटीपोटातील उपयुक्त जिवाणू यांना अपायकारक ठरू शकतो, ज्याचा परिणाम त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर दिसून येतो.

आपल्या गायी किंवा म्हशीला आपण काय चारा देतो यावर त्यांच्याकडून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण ठरते. याउपर, आपला पशू सशक्त व निरोगी राहतोय किंवा तो सतत विविध आजारांना बळी पडतोय हेदेखील आपण त्यांना आहारतून काय देतोय यावर अवलंबून असते. याच आहारावरुन त्यांच्या वाणाची गुणवत्ता आणि पुनरुत्पादन क्षमता ठरली जाते. थोडक्यात, पशूंच्या आहारावरच आपल्या डेअरी व्यवसायाचा नफा किंवा तोटा अवलंबून असतो.

चारा लागवडीचा प्रदेशागणिक असणारा फरक लक्षात घेऊन आम्ही आपल्यासाठी विडियो प्रणालीवर आधारित दुभत्या पशूंचे पोषण हा ऑनलाइन कोर्स तयार केला आहे.

आमच्या तज्ञ समितीमध्ये आम्ही पशूंच्या पोषणआहारशास्त्रातील दिग्गज नावांचा समावेश केलेला आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने चारा कसा दिला जातो, याची पायाभूत माहिती या तज्ञांकडून शिकून घ्या.

भेटा आपल्या प्रशिक्षकांना

डॉ. तेज कृष्णन वल्ली

डॉ. तेज कृष्णन वल्ली हे 40 वर्षांचा अध्यापन व संशोधन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले प्रख्यात पशू आहार तज्ञ आहेत. संबंधित विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली असून त्यांनी दुभत्या पशूंचे पोषणशास्त्र या विषयात नॅशनल डेअरी रिसर्च इनस्टीट्यूट, कर्नाल येथून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. याचबरोबर याच इस्टीट्यूट मध्ये त्यांनी मुख्य संशोधक तसेच विभागप्रमुख यांसारखी महत्वाची पदे भूषवली आहेत.

इंडो-डच फेलोशिप अंतर्गत त्यांनी स्कॉटलंडमधील रोवेत रिसर्च इस्टीट्यूट, अबरदीन याठिकाणी संशोधन केले आहे. यासोबतच डॉ. वल्ली यांनी नेदरलँडमधील इंटरनॅशनल रिसर्च इस्टीट्यूट, वॅग्निनगन सोबतदेखील काम केलेले आहे. डॉ. वल्ली यांनी त्यांच्या संशोधनाच्या एकूण कालावधीपैकी बराच वेळ हा भारतीय हवामानामध्ये दुभत्या पशूंच्या वाढी, पुनरुत्पादन आणि दूध उत्पादन यांच्यावर बायपास प्रथिने व तत्सम तंत्रज्ञानाचा अवलंब करता होणारे परिणाम यांवर संशोधन करण्यात व्यतीत केला आहे. त्यांच्या नावे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये जवळपास 200 हून अधिक संशोधन प्रबंध प्रकाशित झालेले आहेत. दुभत्या पशूंच्या पोषणशास्त्रावरील त्यांच्या या कामगिरीबद्दल अनेक ठिकाणी त्यांची नोंद घेतली गेली असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

डॉ. दिनेश तुकाराम भोसले

डॉ. दिनेश तुकाराम भोसले हे या उद्योगातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असून, मिळकतीचे साधन म्हणून अनेक तरुण व महिला बचत गटांना पशुपालन व्यवसाय उभारण्यात मोलाची मदत केली आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात त्यांना 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. BVSc & AH, MVSc असलेले डॉ. भोसले यांनी इंडियन वेटर्नरी रिसर्च इस्टीट्यूट (IVRI) बरेली, उत्तर प्रदेश येथून पशू पोषण आहारात डॉक्टरेट मिळवली आहे.

या व्यवसायातील अनुभवी तज्ञ असणाऱ्या डॉ. भोसले यांनी अनेक वैज्ञानिक चर्चासत्रांमध्ये तसेच शासनाद्वारे, नामांकित पशुवैद्यकीय महाविद्यालयांद्वारे आणि आयसीएआर संस्थांद्वारे वेळोवेळी आयोजित केलेल्या उद्योग परिषदांना संबोधित करताना असंख्य व्याख्याने दिली आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित उद्योग मंडळे यांचे ते सदस्य म्हणून कार्यरत राहिले असून स्थानिक पातळीवर या क्षेत्रातील अनुभव वाखाणण्याजोगा आहे. ग्रामीण उद्योग विकासातील त्यांच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून, विविध चर्चासत्रांमधून देशभरातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांनी 1000 पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.

या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


हा कोर्स आपल्याला कशा प्रकारे मदत करेल?

डेअरी व्यासायामधील एकूण होणाऱ्या खर्चापैकी सर्वात जास्त खर्च हा आहार आणि चाऱ्यावर होतो. हा कोर्स याच होणाऱ्या खर्चामध्ये कपात करण्यास मदत करेल. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच वेगवेगळी दूध क्षमता असणाऱ्या पशूंची आहाराची गरजदेखील वेगवेगळी असते. एकदा आपण त्यांच्या गरजेनुसार आहार देण्याचे तंत्र समजून घेतले की आपोआपच आहार आणि चाऱ्यावर होणारा खर्च नियंत्रणामध्ये येईल. प्रदेशानुसार चाऱ्याची उपलब्धता आणि पोषणशास्त्राशी निगडीत विविध घटक विचारात घेऊन पशूंना चारा कशा प्रकारे द्यावा हे या कोर्समधून आपण शिकाल.

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर दुभत्या पशूंचे आरोग्य व दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना कोणत्या पोषणमूल्यांची आवश्यकता गरजेची असते हे जाणून घ्यायला शिकाल. जास्त प्रमाणात चारा दिल्याने जास्त प्रमाणात दूध मिळेल या विचारांचे आपण असाल तर यापासून होणारे दुष्परिणाम समजल्यावर आपण आश्चर्यचकित व्हाल.

हा कोर्स आपणाला दुभत्या पशूंच्या नियंत्रित आहाराचे सुसूत्रीकरण कसे करावे याबद्दल इत्यंभूत माहिती देईल. चारा निवडत असताना त्यामध्ये असणारे शुष्क पातळी प्रमाण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या फार्ममध्ये उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याचे शुष्क पातळी प्रमाण शोधण्याची शास्त्रीय पद्धती जाणून घ्याल.

या कोर्सच्या माध्यमातून आपणाला पशूंच्या पोषण प्रणालीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धती यांची ओळख होईल. आपल्या दुभत्या पशूंचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी बायपास फॅट, बायपास प्रथिने यांसारख्या संकल्पना आपणाला या कोर्समधून समजतील. आपले डेअरी फार्म हे पाण्याची टंचाई असणाऱ्या भागात येत असल्यास हायड्रोपोनिक्स, अरोला इ. सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पशूंच्या आहाराची गरज पूर्ण कशी करावी हेदेखील या कोर्समधून आपणाला शिकायला मिळेल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum"दुभत्या जनावरांचे पोषण” या विषयावरील आधारित हा पायाभूत कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील बाबींमध्ये सक्षम बनाल:

पशूंच्या आहार आणि चाऱ्यावर अतिरिक्त खर्च होत असेल तर तो खर्च नियंत्रित कराल

पशूंचे तंत्रशुद्ध वजन करण्यास शिकाल

आहार व चाऱ्याची शुष्क पातळी शोधायला शिकाल

आपल्या दुभत्या पशूंना लागणाऱ्या आहार आणि चाऱ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा कराल

चारा निर्माण करायचा की तो विकत घ्यायचा याचे नियोजन करायला शिकाल

आपल्या पशूंचे आरोग्य आणि दूध उत्पादनात भरघोस वाढ मिळवाल

Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.