दुग्ध प्राण्यांसाठी घर
10 आराखडे मिळवा, आपल्या नवीन किंवा जुन्या गोठ्याला यशस्वी बनवण्यास शिका .
डेअरी फार्म उद्योगातील यश-अपयश ज्या अनेक घटकांवर अवलंबून असते, त्यातील अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे पशूंच्या गोठ्याची स्थिती. या क्षेत्रात यशस्वीरीत्या डेअरी फार्म उभारून नाव मिळवणाऱ्या बऱ्याच जणांच्या यशाचे गमक हे त्यांनी उभारलेल्या गोठ्याच्या रचनेमध्ये आहे, ज्यात कमी मजूर, पशूंसाठी आरामदायी आणि त्यांच्या आरोग्यासाठी परिपूर्ण वातावरण, दुग्ध-व्यवसायामध्ये लागणाऱ्या विविध घटकांच्या साठवणुकीच्या जागेचे सुनियोजन तसेच जैविक सुरक्षिततेची घेतलेली काळजी यांचा सर्वांगाने विचार करून शास्त्रोक्त पद्धतीने केलेली रचना पाहायला मिळते.
आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ड्रेनेज सिस्टमचा प्रकार पाहून पशूंच्या मलमूत्र विसर्जनसाठी आपल्याला किती खर्च करावा लागेल याचा अंदाज येतो. केवळ एवढेच नाही, तर गोठ्यात माशी आणि गोचीड यांचा प्रादुर्भाव होऊन वेगवेगळ्या आजारांची उत्पत्तीदेखील गोठ्याच्या विस्कळीत उभारणीमुळे होऊ शकते. दुग्ध व्यवसायामध्ये मास्टिटिससारखे प्रामुख्याने उद्भवणारे आजार हे संबंधित शेतकऱ्यांनी गोठ्याची उभारणी करताना निवडलेला प्रकार आणि त्याची केलेली बांधणी यावर प्रामुख्याने अवलंबून असतात.
आपल्याला माहीत आहे का, दिवसातील किमान 12 ते 14 तास दुभत्या पशूंना खाली बसून विश्रांती घेण्याची गरज असते? खाली बसून ते जेवढी अधिक विश्रांती घेतील तेवढी त्यांची प्रकृती उत्तम राहून फऱ्यासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्याची त्यांची क्षमता वाढेल. दुभत्या जनावरांना उपलब्ध स्त्रोतांपासून समजा 5 लीटर पाणी मिळत असेल तर यापासून त्यांच्यामध्ये 1 लीटर दूध निर्माण करण्याची क्षमता तयार होते. त्यामुळे, त्यांना सतत स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा मुबलक पुरवठा होईल अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे.
या सर्व घटकांची इत्यंभूत माहिती देणारा “दुभत्या पशूंसाठीचा गोठा” हा परिपूर्ण कोर्स टेप्लूमध्ये प्रथमच बनवला गेला आहे. या कोर्सच्या अंतर्गत आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोठ्यांच्या रचनांची तपशीलवार माहिती दिली जाईल तसेच आम्ही शास्त्रीय पद्धतीने डिझाईन केलेले गोठ्यांचे 15 प्रकार व त्यांचे आरखडे दिले जातील. आपल्या डेअरी फार्ममध्ये पशूंची संख्या 20, 100, 200, किंवा 500 अशी कितीही असुदया, स्मार्ट गोठा उभारणीसाठी लागणाऱ्या अत्यंत सूक्ष्म घटकापासून आपल्याला सर्व प्रकारचे मार्गदर्शन या कोर्सच्या माध्यमातून दिले जाईल. या कोर्समध्ये आपल्याला दाखवले जाणारे विडियो हे बऱ्याच वर्षांपासून डेअरी फार्म यशस्वी चालवणाऱ्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावर प्रत्यक्षात रेकॉर्ड केले आहेत. दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या चालवणाऱ्या तज्ञांकडून या विषयाबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्या.
आपल्या प्रशिक्षकांना भेटा
Your Instructor
डॉ. शैलेश श्यामराव मदने हे बी. व्ही. एससी. & ए. एच. या विषयांमध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षण बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, मुंबई येथून घेतले आहे. नामांकित पशुसंवर्धन सल्लागार असणारे डॉ. शैलेश मदने यांना संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. आजतागायत त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्वच्छ, अंशरहित दूध उत्पादन व्यवसाय सुरु करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. दुभत्या पशूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय हा आर्थिक लाभ देणारा कसा राहील यावर त्यांचा नेहमीच जोर राहिला आहे. आजपर्यंत अशा असंख्य शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देऊन या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी मदत केली आहे.
पशुसंवर्धन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचे कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करतात . जीआरएमएफ पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.शैलेश मदने यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन सेवा प्रयोगशाळेत 3 महिने अभ्यास केला आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे विस्तार तज्ञ म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.
या कोर्सचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होईल?
या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला 15 प्रकारच्या गोठ्यांच्या रचनांबद्दल माहिती दिली जाईल. यापैकी 20 पशूंसाठी डबल शेडसहीत मुकतसंचार पद्धत, सिंगल शेडसहित मुकतसंचार पद्धत आणि बंदिस्त गोठा पद्धत अशा 3 प्रकारची माहिती मिळेल. त्याचप्रकारे, 100 देशी (भारतीय गोवंश) गायी/म्हशींच्या क्षमतेसाठी लागणाऱ्या गोठ्यासाठी डबल शेडसहित मुकतसंचार पद्धत, सिंगल शेडसहीत मुकतसंचार पद्धत आणि बंदिस्त गोठा पद्धती अशा 3 प्रकारांची विस्तृत माहिती मिळेल.
या कोर्सद्वारे, आपल्याला 100 संकरीत वाणांच्या (एच.एफ. & जर्सी किंवा दोन्ही मिक्स) गायींसाठी लागणाऱ्या मुकतसंचार गोठा पद्धतीचादेखील आराखडा दिला जाईल. 200 संकरीत आणि जर्सी गायींसाठी, आपल्याला मुकतसंचार गोठा पद्धत, चौरस पद्धत आणि मुकतसंचारसहित दूध काढणीसाठी स्वतंत्र शेड अशा 3 पद्धतींची माहिती मिळेल. याशिवाय आपल्याला दूध काढण्यासाठी 12 पशूंसाठी डिझाईन केलेली “हेरींग-बोन मिल्कींग पार्लर” पद्धतीचीदेखील माहिती दिली जाईल. आपण 500 पशूंसाठी लागणाऱ्या गोठ्याचा विचार करत असाल तर आपणाला मुकतसंचार गोठा पद्धत आणि चौरस गोठ पद्धत अशा 2 प्रकारांची माहिती या कोर्समधून दिली जाईल.
या कोर्समध्ये, गोठ्यांच्या आराखड्यांची रचना करताना उभारणी करताना लागणारा खर्च कमी कसा राहील यावर भर दिला असून ज्यात कमी गुंतवणूक करूनदेखील शास्त्रीय दुग्ध-व्यवसायावरजोर राहील अशी व्यवस्था केली आहे. या गोठ्यांच्या रचनांद्वारे, डेअरीमध्ये कामासाठी अगदी कमी प्रमाणात मनुष्यबळ लागेल याची काळजी घेतली गेली आहे, तसेच पशूंना नैसर्गिक वातावरणाचा लाभ मिळून त्यांचे आरोग्य उत्तम राहील याची दक्षता घेतली गेली आहे. आपल्या छोट्या गोठ्याचे रूपांतर भविष्यात मोठ्या गोठ्यात सहजरीत्या करता येईल एवढी लवचिकता या आराखड्यात ठेवली आहे.
आपला प्रदेश अतिपर्जन्यक्षेत्रात, दुष्काळी भागात, दमट किंवा थंड भागात असा कोणत्याही वातावरणात येत असेल तरीदेखील हा कोर्स आपला गोठा वाढवण्यासाठी किंवा नवीन डेअरी फार्म उभारणी करण्यासाठी मोलाची मदत करेल. साधारणपणे गोठा वाढवत असताना किंवा नवीन गोठा उभारत असताना बऱ्याच चुका आपल्याकडून नकळत घडतात ज्यामुळे उभारणीवर होणाऱ्या एकूण खर्चात वाढ होते. या चुकांचा परिणाम बराच काळ कोणत्या ना कोणत्या पद्धतीने डोके वर काढून आपल्याला नियोजनात्मक आघाडीवर अडचणी निर्माण करतो. या कोर्सच्या माध्यमातून अशा अडचणी ओळखण्यात आणि संभाव्य चुका टाळण्यात नक्कीच आपल्याला मदत करेल.
या कोर्समधून डेअरी फार्मशी निगडित प्रत्येक घटकाची अगदी तपशीलवार माहिती आपल्याला दिली जाईल, जसे की चाऱ्याची दावण, कोबा, पशूंची उभा राहण्याची जागा, दावणीचा कट्टा, रेल्स, हेडलॉक, वेगवेगळे कप्पे, पाण्याचे कुंड, मोकळा परिसर, शेड, दूध काढण्यासाठी स्वतंत्र विभाग, दुभती जनावरे, गाभण गायी, कालवडी, वासरे यांच्यासाठी स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था, शेणखतासाठी उकिरंडा, साठवणुकीसाठी आणि उपकरण ठेवण्यासाठी विभाग, मुरघासासाठी खड्डे आणि बंकर, माजावर आलेल्या पशूसाठी नियोजन, जैविक सुरक्षितता आणि इतर बरेच काही. शेकडो यशस्वी फार्मच्या अभ्यास करून, त्यातील सर्वोत्तम निवडून आपल्या डेअरी फार्मसाठी सर्वार्थाने योग्य ठरतील असे आरखडे तयार करण्यावर आम्ही विशेष काळजी घेतली आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा
"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"
हा कोर्स घेतल्यानंतर या कोर्ससोबत आपणाला खालील गोष्टी मिळतील:
२५ हून अधिक विडियोज्चा त्वरित ऍक्सेस
एका वर्षासाठी तज्ञांचे मार्गदर्शन
डाउनलोड
यशस्वी डेअरी फार्म बनवण्यास १0 आराखडे मिळवा
१ मिल्किंग पार्लर आराखडा
मुरघास खड्डा आणि बंकर आकार
"दुग्ध प्राण्यांसाठी घर या विषयावरील हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील घटक शिकाल:
आपल्या विद्यमान शेतीतील घरे सुधारित करा
आपल्या स्थानानुसार गोठ्याचा योग्य प्रकार सुनिश्चित करणे
उत्तम आरोग्यासाठी सुरक्षित गोठ्याचा आराखडा तयार करणे
आमचे डिझाईन वापरुन आपल्या डेअरी फार्मसाठी शेड उभारणी करणे
देशी गायी, संकरीत गायी किंवा म्हशींसाठी फार्म तयार करणे
बांधकाम करताना वायफळ जाणाऱ्या खर्चात बचत करणे
विडियो प्रणालीच्या सहाय्याने बऱ्याच गोठ्यांच्या आरखड्यांची माहिती घेणे
गुरांचा गोठा उभारताना येणाऱ्या अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाणे
Frequently Asked Questions
अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.