भ्रूण हस्तांतरण तंत्र वापरून तुमचा दुग्धव्यवसाय चा नफा वाढवा.

एम्ब्र्यो ट्रान्सफर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रजनन समस्या कमी करा.

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान वापरून तुमच्या दूधव्यवसायाचा नफा वाढवा.

या कोर्समधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?

भ्रूण हस्तांतरण तंत्र हे एक ईटीटी तंत्र आहे ज्याद्वारे दाता मादी गायीकडून भ्रूण गोळा केले जातात आणि प्राप्तकर्त्या मादी गायीकडे हस्तांतरित केले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला ईटीटी कसे करायचे आणि त्याचे महत्त्व शिकवले आहे. ईटीटी प्रक्रियेचा वापर करून तुम्ही तुमचा दुधाव्यवसायचा नफा वाढवू शकता. या प्रक्रियेचा वापर करून तुम्ही तुमच्या डेअरी फार्ममध्ये चांगल्या जनावरांची पैदास करू शकता जे तुमच्या डेअरी फार्ममध्ये अधिक दूध देणारे प्राणी तयार करू शकतात. तुम्ही इथे ईटीटी चा दोन तंत्रांबद्दल शिकू शकता . यामध्ये तुम्ही गाईच्या वैशिष्ट्य नुसार ईटीटी कशी करावी हे सुद्धा शिकवण्यात आले आहे .ईटीटी चा वापर करून तुम्ही वर्षातून अनेक वेळा प्राण्यांची पैदास करू शकता. या तंत्रात, आपण अनेक वर्षगर्भ साढवून ठेवू शकतो.

ईटीटी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम प्राणी प्रजनन तंत्राचा एक विशेष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आम्ही सर्वात अनुभवी तज्ञांचे ज्ञान तुमच्यासाठी आणले आहे . तुमच्या डेअरी फार्म मध्ये उत्तम प्रजनन करण्यासाठी आणि डेअरी फार्मचा नफा वाढवण्यासाठी या ऑनलाइन अभ्यासक्रम मध्येसामील व्हा.


Your Instructor


डॉ. सतिश हरकळ
डॉ. सतिश हरकळ

डॉ. सतिश हरकळ हे एम. व्ही. एससी. (प्राणी पुनरुत्पादन, गायनोकॉलोजी आणि प्रसूतीशास्त्र) या विषयामध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षणअकोला व्हेटर्नरी कॉलेज,येथून घेतले आहे . नामांकित भ्रूण हस्तांतरण सल्लागार असणारे डॉ सतिश हरकळ यांना संबंधित क्षेत्रात २ वर्षाहून अधिक अनुभव आहे. आजलगत त्यांनी असंख्य शेतकरण्याना भ्रूण हस्तांतरण तंत्र वापरून आपला व्यवसाय कसा लाभदायी करावा या संबंधी मदत केली आहे. सध्या डॉ सतिश हारकळGodrej Maxximilk Pvt. Ltd. Nashik मध्ये IVF एक्स्पर्ट म्हणून कार्यरीत आहे. त्यांनी पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान पदव्युत्तर संस्था, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर महाराष्ट्र येथे गुरे आणि शेळ्यांमध्ये इन विट्रो फर्टिलायझेशनवर आपले पदवीधर चे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये ET एक्स्पर्ट आणि OPU टेक्निशियन म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.


Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

Get started now!