दुग्ध प्राण्यांची निवड

तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जनावरांच्या निवडीची कला व तंत्रामध्ये पारंगत व्हा.

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

तुम्हाला बाजारात जाऊन दुभती जनावरे खरेदी करायच्या विचारानेच भीती वाटते का? तुम्ही खरेदी केलेल्या जनावराने पुरेसे दूध दिले नाही किंवा आजारी पडले तर काय अशी भीती वाटते का? काळजी करू नका अशी भीती फक्त तुम्हालाच वाटत नाही. अनेक लोक नवीन जनावरे खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम देतात व ती आपल्या शेतावर घेऊन आल्यावर त्यांना पश्चात्ताप होतो.

तुम्ही तुमचे सर्वोत्तम दुभते जनावर कधी बाजारात विकाल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर इतर कुणी अशी जनावरे बाजारात विकेल अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता. म्हणूनच चांगल्या जातीची व भरपूर दूध देऊ शकतील अशी नवीन दुभती जनावरे निवडणे हे कौशल्य आहे व विज्ञानही.

टेपलूमध्ये आम्ही दुभती जनावरे निवडण्याविषयीचा हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अनेक तज्ञांची मदत घेतली ज्यांना या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. जनावर निवडताना विचारात घ्यायच्या प्रत्येक गोष्टीचा एवढ्या बारकाईने विचार करून आत्तापर्यंत कधीच कोणताही अभ्यासक्रम तयार करण्यात आला नव्हता. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला ही सगळी व्यावहारिक कौशल्ये शिकता येतील व आत्मविश्वासने जनावराची निवड करता येईल.

या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सर्वोत्तम दुभती जनावरे निवडता यावीत यासाठी जनावरांच्या विविध जाती, त्यांची क्षमता, त्यांच्या निवडीचे वेगवेगळे निकष म्हणजे उदाहरणार्थ शारीरिक स्थितीचे गुण, दूध देण्याचा टप्पा, वय इत्यादी शिकवले जाईल. त्याचशिवाय जनावरे कुठून खरेदी करावीत व त्यांची वाहतूक करताना काय काळजी घ्यावी यासारखी सर्व व्यावहारिक कौशल्येही शिकवली जातील.

भेटा आपल्या प्रशिक्षकांना


Your Instructor


डॉ. शैलेश श्यामराव मदने
डॉ. शैलेश श्यामराव मदने

डॉ. शैलेश श्यामराव मदने हे बी. व्ही. एससी. & ए. एच. या विषयांमध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षण बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, मुंबई येथून घेतले आहे. नामांकित पशुसंवर्धन सल्लागार असणारे डॉ. शैलेश मदने यांना संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. आजतागायत त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्वच्छ, अंशरहित दूध उत्पादन व्यवसाय सुरु करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. दुभत्या पशूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय हा आर्थिक लाभ देणारा कसा राहील यावर त्यांचा नेहमीच जोर राहिला आहे. आजपर्यंत अशा असंख्य शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देऊन या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी मदत केली आहे.

पशुसंवर्धन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचे कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करतात . जीआरएमएफ पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.शैलेश मदने यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन सेवा प्रयोगशाळेत 3 महिने अभ्यास केला आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे विस्तार तज्ञ म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.


या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

एका उत्तम दूध डेअरीसाठी चांगली जनावरे असणे महत्त्वाचे असते. तुमची डेअरी उभारणे ही टप्प्या टप्प्याने होणारी प्रक्रिया आहे व त्यामध्ये काळजीपूर्वक जनावरांची निवड करणे व ठराविक काळाने ती बदलण्याचाही समावेश होतो. तुमच्या शेतावर जन्मलेल्या जनावरांचा कळप तयार करण्यासाठी तुमच्याकडे पशुसंवर्धनाचे एक धोरण असले पाहिजे, त्याचशिवाय तुम्ही काही वेळा उत्पादन कायम राखण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी बाहेरूनही जनावरे आणली पाहिजेत.

आमच्याकडे अनेक शेतकरी तक्रार घेऊन येतात की ते जनावर खरेदी करायला गेले तेव्हा ते 15 लीटरहून अधिक दूध देत होते. मात्र शेतावर घेऊन आल्यावर मात्र तिने 5 लीटरच दूध द्यायला सुरूवात केली. या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला अशा अडचणी टाळण्यासाठीची वैज्ञानिक तंत्रे शिकवली जातील.

तुम्ही जनावरे खरेदी केल्यानंतर त्यांची वाहतूक सुरक्षितपणे व कोणतीही इजा न होता करणे महत्त्वाचे आहे. ती तुमच्या शेतापर्यंत पोहोचताना वाटेत कोणत्याही संसर्गजन्य आजाराने बाधित होऊ नयेत. जनावरांची वाहतूक कशी करायची व ती कुठून खरेदी करायची हेसुद्धा तुम्ही यात शिकणार आहात.

या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या जनावराला काही आरोग्य समस्या आहेत का हे चटकन समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची तंत्रे शिकण्यास मदत होईल. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला केवळ जनावरे खरेदी करतानाच नाही तर तुम्ही सर्व प्रक्रियांचे पालन केले तर डेअरीच्या दैनंदिन कामकाजात त्यांचे आजार टाळण्यास मदत होईल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum



सर्वोत्तम दुभती जनावरे निवडण्याविषयीचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल:

तुमच्या शेतावर कोणत्या प्रकारची जनावरे आवश्यक आहेत हे ठरविणे

एका दुभत्या जनावराचे जीवनचक्र समजून घेणे

जनावरांना दूध देण्याच्या टप्प्यानुसार ओळखणे

दात तपासून वय ओळखणे

शारीरिक स्थितीनुसार गुण देण्यात कुशल होणे

प्राण्यांना टॅग लावणे व नोंदी करणे

रस्त्याने किंवा रेल्वेने दुभत्या जनावरांची सुरक्षितपणे वाहतूक करणे

प्राण्यांना कोणत्याही आरोग्य समस्या आहेत का हे ओळखणे


Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.