Teplu Courses to improve income in dairy farming

                          

 टेपलु दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमी-खर्चात ऑनलाइन कोर्स हिंदी आणि मराठीमध्ये सादर करत आहे

 

टेपलु, पशुपालन उद्योगातील एक अग्रणी स्टार्ट-अप, यांनी एक अभिनव ऑनलाइन शिक्षण कोर्स प्रारंभ केला आहे जो भारताच्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना समर्पित आहे. टेपलु लर्निंग प्रायव्हेट लिमीटेड यांनी आज शास्त्रीय दुध उत्पादनाविषयी बहुभाषीय व्हिडिओ आधारित तीन विभिन्न भाषांमध्ये ऑनलाइन कोर्सची घोषणा केली - हिंदी, मराठी आणि इंग्रजी. हा परवडण्याजोगा कोर्स असून याचे लक्ष्य सर्व स्तरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना समर्थन पुरवणे आहे. 

 

हा ऑनलाइन कोर्स सर्व शास्त्रीय प्रणाली पायरी पायरीच्या प्रक्रियेसह शिकवतो ज्या दुध उत्पादनाला फायदेशीर बनवतात. हे कोर्स दुध उत्पादनाच्या क्षेत्रातील सर्वोच्च आठ तज्ञांसह तयार केले गेले आहेत. या तज्ञांना शेतकऱ्यांना दुध उत्पादन फार्म यशस्वीपणे उभा करून देणे आणि व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. हे कोर्स संपूर्णपणे व्हिडिओ आधारित आहेत आणि अभिनवपणे डिझाईन केलेले आहेत ज्यामुळे अगदी एक दहा वर्षांचा मुलगा देखील हे शिकू शकतो आणि आपल्या फार्मवर शास्त्रीय व्यवस्थापनाच्या प्रथा अंमलात आणू शकतो. कोर्समध्ये चारा उत्पादन, पोषण, गोठा बांधणी, आजारांपासून ते पुनरूत्पादक समस्यांपर्यंत सर्व प्रक्रिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहे.

 

या प्रसंगी श्री. संजय भट्टाचार्जी, टेपलुचे संस्थापक आणि निर्देशक, म्हणाले, “भारतातील दुध उत्पादन क्षेत्राला पारंपारिकपणे कमी दूध उत्पादन, कमी पुनरूत्पादन, असमाधानकारक व्यवस्थापन आणि दुधाळ जनावरांना अपुरे पोषण यांच्या समावेशासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेपलुमध्ये, आमचे ध्येय आहे की लोकांना दुध उत्पादनाच्या व्यवसायात यशस्वी बनवणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे. मी स्वतः एक दुध उत्पादक शेतकरी असल्यामुळे, मला या व्यवसायातील खोलवर मूळापर्यंत असलेल्या समस्या आणि वेदना बिंदूंची जाण आहे. दूरस्थ प्रदेशातील लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी फार थोडे लोक उपलब्ध असल्यामुळे, त्यांच्याकडे दुध उत्पादनामध्ये पारंपारिक प्रथांवर अवलंबून राहाण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो.” श्री. भट्टाचार्जी अधिक पुढे म्हणाले, “टेपलु त्या व्यावहारिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून ऑनलाइन कोर्स बनवते ज्यांचा शेतकऱ्यांना दुध उत्पादनामध्ये सामना करावा लागतो आणि सर्वोच्च तज्ञ आणि प्रतिष्ठीत संस्थांना एकत्रित आणते. शेतकरी आता त्यांचे स्मार्ट फोन वापरून सर्वोच्च तज्ञांकडून शिकू शकतात .”  

टेपलूने मूरघास बनवण्याविषयी 2019च्या प्रारंभात एक बेटा उत्पादन लाँच केले, तेव्हापासून नंतर त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेतकरी हळुहळु सामिल होताना पहायला मिळाले आहे. संशोधन दर्शवते की शास्त्रीय व्यवस्थापन प्रथांमध्ये विकास झाल्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 20%पेक्षा जास्त वाढ होण्याचा परिणाम झाला आहे. 

 

टेपलु लर्निंग प्रायव्हेट लिमीटेड विषयी:

 

टेपलु एक स्टार्ट-अप आहे जे भारतीय पशुविज्ञान संशोधन संस्था (आयव्हीआरआय), इज्जतनगर, यांच्याद्वारे उभारले गेले आहे, जी भारताची पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञानमधील एक प्रमुख संस्था आहे. ती डीआयपीपी, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकारसह नोंदणीकृत आहे. कंपनीला युरेका 2018च्या दरम्यान आयआयटी बॉम्बेद्वारे सर्वोच्च स्टार्ट-अपपैकी एक मानले गेले होते

टेपलु पशुपालन उद्योगावर अभ्यासक्रम आधारित ऑनलाइन कोर्स स्थानिक भाषांमध्ये निर्माण करते. वापरकर्ता स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरवर ते प्राप्त करू शकतात. स्वयं-गतीच्या कोर्सव्यतिरिक्त, कंपनी ऑनलाइन परस्पर संवाद सत्रे देखील आयोजित करते ज्यामुळे शिकणारे विद्यार्थी त्यांच्या शंका दूर करू शकतील आणि समस्या सोडवू शकतील ज्यांचा त्यांना त्यांच्या फार्ममध्ये सामना करावा लागतो. टेपलुचा प्लॅटफॉर्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्ज्ञानयुक्त तंत्रज्ञान वापरतो आणि चाचण्या आयोजित करतो आणि पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. ऑनलाइन कोर्समध्ये अधिक भर म्हणून, कंपनी सानुकूल फार्म डिझाईन्स आणि वेब आधारित व्हिडिओ कॉल्सवर आधारित डिजीटल सल्लामसलत सेवा देखील पुरवते

कोर्सविषयी येथे पहा– https://teplu.in/courses

 

संपर्क तपशील:

वेब: www.teplu.in

इ-मेल: [email protected]