डेअरी पोषणाविषयी प्रगत अभ्यासक्रम
दुभत्या जनावरांसाठी पशुखाद्य तयार करायला शिका. तज्ञांकडून शिका.
Watch Promo
दुभत्या जनावरांना संतुलित आहार मिळावा यासाठी कोणते पशुखाद्य व चारा द्यावा व किती प्रमाणात द्यावा असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तुम्ही जेव्हा प्राण्यांना त्यांचे वजन व दूध देण्याची पातळी यानुसार आवश्यक ती पोषकद्रव्ये देता तेव्हा तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्त दूध उत्पादन मिळते. तुम्ही डेअरी पोषणाविषयीच्या या प्रगत अभ्यासक्रमात दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांसाठी संतुलित आहार कसा तयार करायचा हे शिकणार आहात.
हा डेअरी पोषणाविषयीचा प्रगत अभ्यासक्रम पोषणाविषयीच्या प्राथमिक अभ्यासक्रमापेक्षा कसा वेगळा आहे, असे तुम्हाला वाटेल. पोषणाविषयीचा प्राथमिक अभ्यासक्रम पोषणाच्या विविध पैलूंची माहिती देतो व तुम्हाला दुभत्या प्राण्यांच्या आहाराविषयी ढोबळ नियम सांगतो, तर प्रगत अभ्यासक्रमात दुभत्या जनावरांसाठी आहाराची सूत्रे कशी मोजावीत व तयार करावीत हे तुम्हाला शिकवले जाते. याचाच अर्थ असा होतो की तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य, चारा व खनिज मिश्रणे असल्यास या अभ्यासाक्रमामध्ये तुम्हाला दुभत्या जनावरांना त्यांचे वय, वजन व दूध देण्याचा टप्पा यानुसार प्रत्येक घटक किती प्रमाणात आवश्यक आहे कसे शोधायचे हे शिकवले जाईल.
हा अभ्यासक्रम पशुखाद्य व चाऱ्यातून मिळणारी ऊर्जा, प्रथिने, न्यूटर डिटर्जंट फायबर (एनडीएफ), खनिजे इत्यादी घटकांविषयी सखोल माहिती देतो व तुम्हाला दुभत्या जनावरांच्या विविध टप्प्यांमधील पोषणविषयक गरजा कशा शोधायच्या हे शिकवतो. हे समजल्यानंतर व पशुखाद्य व चाऱ्यात कोणती पोषकद्रव्ये असतात हे माहिती असल्यावर, तुम्ही नेमके किती प्रमाणात पशुखाद्य, खनिजे व पूरक घटक द्यायचे याचे सूत्र तयार करू शकता.
टेपलूमध्ये आम्ही अशाप्रकारचा पहिलाच ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहे जो दुभत्या जनावरांसाठी आहार सूत्रे कशी तयार करायची हे शिकवतो. हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी डेअरी पोषण क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ञांनी योगदान दिले आहे. विषय सोपा करून समजून सांगण्याच्या आमच्या तत्त्वानुसार हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, म्हणून तुम्ही स्वतः आहाराची सूत्रे तयार करू शकाल. चला तर मग शिकण्याचा आनंद घ्या.
भेटा आपल्या प्रशिक्षकांना
Your Instructor
डॉ. के. एस. रामचंद्र हे प्रसिद्ध पशु आहारतज्ञ असून त्यांना संशोधक, नियोजनकर्ता व धोरण अंमलबजावणी तज्ञ म्हणून मोठा अनुभव आहे. त्यांनी अलाहाबाद कृषी संस्थेतून पशुपालन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली व राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल येथून पशु आहार याविषयात डॉक्टरेट केले. त्यांनी आयसीएआरमध्ये इंडियन ग्रासलँड अँड फूडर रिसर्च इन्स्टिट्यूट व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रीशन अँड फिजिऑलॉजीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.
त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, पशु पोषण या विषयात विशेषतः पशुखाद्याचे स्रोत या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारत सरकारचे अतिरिक्त सचिव दर्जाचे तांत्रिक तज्ञ म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्रालये व राज्य सरकारांना देशातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या प्रदेशांचा संघटित व सर्वसमावेशक विकास कसा करायचा, विशेषतः दुग्धोत्पादन व पशुपालन व्यवसायाचा विकास कसा करायचा याविषयी सल्ला दिला आहे. ते भारतीय डेअरी महासंघाचे कार्यकारी सदस्य असून त्यांचे भारतीय डेअरी क्षेत्राच्या वाढीत व विकासात मोलाचे योगदान आहे.
हा कोर्स आपल्याला कशा प्रकारे मदत करेल?
तुमची स्वतःची दूध डेअरी असेल किंवा तुम्ही दूध डेअरीत कामाला असाल तरी या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला अनेक प्रकारे मदत होऊ शकते. अनेक यशस्वी डेअरी अशा लोकांना नोकरी देतात जे दूध डेअरींसाठी आहार सूत्रे तयार करण्यात तरबेज आहेत. या अभ्यासक्रमामुळे तुमचा अशी सूत्रे तयार करण्याचा पाया तयार होईल.
दूध डेअरीच्या एकूण खर्चातील 65% ते 70% खर्च पशुखाद्य व चाऱ्यावर होतो. दुभत्या जनावरांच्या वयाच्या व दूध देण्याच्या टप्प्यानुसार त्यांच्या आहाराच्या गरजा कशा शोधायच्या हे शिकून, तुम्ही त्यांना नेमक्या प्रमाणात पशुखाद्य व चारा देऊ शकाल. यामुळे तुम्हाला दुधाचे उत्पादन सुधारता येईल व तुमचा पशुखाद्य व चाऱ्यावरील खर्च कमीत कमी ठेवता येईल.
तुम्हाला काही वेळा शेतात एकाच प्रकारचे पशुखाद्य व चारा कदाचित उपलब्ध होणार नाही. हा अभ्यासक्रम शेतात चाऱ्यासाठी कोणते पर्यायी स्रोत वापरता येतील हे समजून घ्यायला तुम्हाला मदत करेल. तुम्ही अशा पशुखाद्यातून व चाऱ्यातून किती पोषकद्रव्ये मिळू शकतात हे मोजू शकाल. काही प्रकारचे पशुखाद्य जनावरांची वाढ होताना चुकीच्या टप्प्यात दिले तर त्याचा अपाय होऊ शकतो. तुम्ही असे धोके कसे टाळायचे हे शिकाल.
योग्य पोषण मिळाल्याने, जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढते व तुम्ही तुमच्या शेतात अनेक रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकता. हा अभ्यासक्रम तुम्हाला डेअरी पोषणाविषयी वैज्ञानिक माहिती देतो ज्यामुळे तुमच्या जनावरांचे आरोग्य सुधारेल. ही माहिती व तुमचा शेतीतील अनुभव याआधारे तुम्ही यशस्वीपणे विविध प्रकारच्या दुभत्या जनावरांसाठी आहाराची सूत्रे तयार करू शकता.
ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा
"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"
Course Curriculum
-
Startजनावरांच्या जीवनचक्रातील विविध टप्प्यांवर चारा पुरवठा कशा प्रकारे असावा याबद्दल जाणून घेऊया (6:17)
-
Startजनावरांचा आहार आणि त्यांच्यासाठी लागणारी चारापिके निवडताना कोणते घटक अत्यंत महत्वाचे आहेत? (2:49)
-
Startवैरणीमधील एडीएफ आणि एनडीएफ म्हणजे काय? (2:51)
-
Startविविध प्रकारच्या आहार आणि चारापिकांमध्ये नैसर्गिक प्रथिने, एडीएफ आणि एनडीएफचे प्रमाण किती असते? (3:12)
-
Startआपल्या दुभत्या जनावरांचे चांगले आरोग्य आणि दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी कोणत्या प्रकारचा चारा आणि पशुआहार देण्यात यावा? (10:14)
-
Startजनावरांच्या जीवनचक्राचा पहिला टप्पा म्हणजे जन्मापासून ते त्यांचे दूध पिणे थांबवण्याचा टप्पा (4:40)
-
Startतुम्ही जनावरांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दूध सोडविण्यापासून ते गाभण राहण्याच्या वयापर्यंत काय खाऊ घालावे? (4:43)
-
Startतुम्ही जनावरांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दूध सोडविण्यापासून ते गाभण राहण्याच्या वयापर्यंत काय खाऊ घालावे? भाग २ (5:00)
-
Startतुम्ही दुधाळ जनावरांना तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ती दूध देऊ लागऱ्यावर काय खाऊ घालावे? (3:50)
-
Startतुम्ही दुधाळ जनावरांना दूध देण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काय खाऊ घातले पाहिजे? (5:46)
-
Startतुम्ही दुधाळ जनावरांना दूध देण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काय खाऊ घातले पाहिजे? भाग २ (4:25)
-
Startदुधाळ जनावरांना दूध देण्याच्या मधल्या व शेवटच्या टप्प्यामध्ये किती पशुखाद्य व चारा द्यावा लागतो? (6:48)
-
Previewदुधाळ जनावरांना भाकड काळात किती पशुखाद्य व चारा आवश्यक असतो? (4:46)
-
Startदुधाळ जनावरांना भाकड काळात किती पशुखाद्य व चारा आवश्यक असतो? भाग २ (4:08)
-
Startतुम्ही तुमच्या गोठ्यातील जनावरांसाठी संतुलित आहार तयार करताना पुढील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत (5:56)
डेअरी पोषणाविषयीचा हा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील:
पशुखाद्य व चारा निवडण्यासाठी आवश्यक निकष समजून घेणे
पशुखाद्य व चाऱ्यातील क्रूड प्रथिने, एनडीएफ व एडीएफच्या पातळ्या शोधणे
पुढील जनावरांसाठी स्थानिक उपलब्ध संसाधनांचा वापर करून आहाराची सूत्रे तयार करणे:
नवजात वासरापासून ते दुग्धपान सोडविण्याच्या टप्प्यापर्यंत
कालवडीपासून ते प्रजननाच्या वयापर्यंत
दुभती जनावरे जेव्हा दूध देऊ लागतात
दूध देण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील दुभती जनावरे
दूध देण्याच्या मधल्या व नंतरच्या टप्प्यातील दुभती जनावरे
दूध आटलेली व भाकड जनावरे
दुभत्या जनावरांना टीएमआर देणे
Frequently Asked Questions
अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ९९९ रू.