वासरे आणि कालवडींचे व्यवस्थापन
वासरांची व्यवस्थित देखभाल करून ती फायदेशीर प्रौढ जनावरे कशी होतील याचा प्रत्येक पैलू शिका
Watch Promo
वासराची योग्य देखभाल केल्यामुळे तुमचा नफा कसा वाढू शकतो? वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धतींचा वापर केल्याने चांगल्या जातीची वासरे 2 वर्षात प्रौढ गायी होतात. त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते व दूध देऊन त्या तुमचे उत्पन्न वाढवतात. वासरू व कालवडीची योग्य ती काळजी घेतल्यामुळे तुमच्या शेतात जनावरांची सशक्त “पुढची पिढी” तयार होते व नियमित उत्पन्नासाठी मजबूत पाया रचला जातो.
वासराचे वैज्ञानिक व्यवस्थापन म्हणजे काय? वासराच्या पालनपोषणाचे व्यवस्थापन, गर्भ आईच्या उदरात असतानाच सुरू होते. तुमच्या शेतात एकाही वासराचा मृत्यू होऊ नये याची खात्री करण्यासाठी, वासराचा जन्म झाल्यावर लगेच योग्य ती काळजी घेणे, योग्य प्रमाणात व योग्य दर्जाचा दुधाचा चीक पाजणे यासारख्या अनेक प्रक्रिया महत्त्वाच्या असतात.
तुमचे वासरू सुदृढ असावे व साधारण 2 वर्षात दुभते व्हावे असे वाटत असेल, तुम्ही त्यांच्या वजनानुसार त्यांना योग्य पशुखाद्य व चारा दिला पाहिजे. त्याचवेळी तुम्हाला कमीत कमी खर्चात जनावराच्या वजनात अपेक्षित वाढ हवी असेल तर तुम्हाला खर्चाचा योग्य मोबदला मिळेल याची खात्री केली पाहिजे.
टेपलूमध्ये आम्ही ‘वासरू व कालवड व्यवस्थापन’ हा विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दूध डेअरीमध्ये एकाही जनावराचा मृत्यू होणार नाही याची खात्री करता येईल. तुम्ही वासराचे पालनपोषण करताना सर्व वैज्ञानिक पद्धतींचा वापर केल्यास तुम्हाला वासरांमध्ये व कालवडींमध्ये आजारांची लक्षणे समजू शकतील व ते टाळता येतील.
हा तुम्ही तुमच्या वेगाने शिकू शकाल असा व्हिडिओआधारित अभ्यासक्रम आहे जो तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा वैयक्तिक संगणकावर पाहू शकता. हे व्हिडिओ आमच्या तज्ञांनी वेगवेगळ्या भागातील विविध यशस्वी शेतांवर रेकॉर्ड केले आहेत. हा व्यावहारिक अभ्यासक्रम तयार करण्यात सर्वोत्तम पशुवैद्यक सहभागी झाले आहेत म्हणजे तुम्ही यशस्वीपणे तुमच्या दूध डेअरीतील वासरे व कालवडींच्या वाढीचे व विकासाचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकू शकाल.
आपल्या प्रशिक्षकांना भेटा
Your Instructor
डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी हे Bvsc. & AH या पदवीचे तज्ञ असून पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या क्षेत्रामध्ये त्यांचा 37 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रतिष्ठित अशा इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस 2019 मध्ये त्यांनी “फॅमिली विथ मोस्ट जनरेशन्स ऑफ वेटर्नरी डॉक्टर्स” अशा गौरवोद्गारांसह मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या घराण्यातील सलग चार पिढ्या 1918 ते 2018 या कालखंडामध्ये पशूवैद्यकीय तज्ञ म्हणून कार्यरत राहिलेल्या आहेत.
ते दुभत्या जनावरांमधील आरोग्यविषयक समस्या व आजार व्यवस्थापन या क्षेत्रामधील विशेष तज्ञ असून त्यांचा या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बऱ्याच पॉलीक्लिनिकसाठी पशुधन विकास अधिकारी म्हणून काम पाहिले असून गेली कित्येक वर्षे हजारो पशूंवर त्यांनी उपचार केले आहेत. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत याठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असताना डेअरी फार्मशी संलग्न असणाऱ्या असंख्य व्यवहारीक अडचणींचा तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सखोल मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत केली आहे.
या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?
हा पाठ्यक्रमावर आधारित अभ्यासक्रम तुम्हाला शेतावर कोणत्या प्रक्रियांचे पालन करायचे हे दाखवून वैज्ञानिक व्यवस्थापन तंत्रे शिकवेल. तुमचे वासरू जन्मल्यानंतर श्वास घेत नसेल किंवा नाळेला संसर्ग झाला असेल, तर त्यांच्या जन्मापासून ते प्रौढ होईपर्यंत त्यांना सुदृढ कसे ठेवायचे याविषयी विविध तंत्रे तुम्ही शिकणार आहात. इतर तंत्रांमध्ये कानावर टॅग लावणे, शिंग कापणे, लसीकरण व जंतनाशक औषध देणे यांचा समावेश होतो.
तुम्ही वासरू सुदृढ राहावे यासाठी त्यांना काय खाऊ घालावे व कसे खाऊ घालावे हे शिकणार आहात. यात वासरू व प्रौढ दुभत्या जनावरांच्या पोटातील फरक समजून घेण्यापासून ते चीक पाजणे, दूध, दूधाला पर्याय, आहाराची सुरूवात कशापासून करावी, घन आहार देण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही शिकायला मिळेल. तुम्हाला वासराचे वजन स्वतः मोजता येईल.
तुम्हाला देशी किंवा गावरान, संकरित व म्हशी इत्यादी डेअरीसाठीच्या विविध प्रकारच्या वासरांचे वजन नेमके किती असले पाहिजे व त्यांच्या वाढीचा अपेक्षित दर सांगितला जाईल. तुम्हाला वासरू व कालवडीचे वजन वाढीचे महत्त्व समजेल व वजनाचे निरीक्षण व व्यवस्थापन कसे करायचे हे शिकता येईल. तुम्हाला कालवडींसाठी योग्य आहार सूत्र कसे तयार करायचे हे शिकता येईल म्हणजे त्या योग्यवेळी वयात याव्यात यासाठी त्यांना योग्य प्रमाणात पोषण देता येईल.
वासरांना अतिसार, न्यूमोनिया यासारखे आजार झाल्यामुळे शेतातील वासरांचा मृत्यूदर वाढतो. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला वासरांचे आजार कसे ओळखायचे म्हणजे तुम्हाला पशुवैद्यकांची मदत वेळीच घेता येईल हे समजेल. तुम्ही कालवडींचे कृत्रिम रेतन कसे करायचे व त्या पहिल्यांदा दुभत्या झाल्यावर त्यांची प्रजनन क्षमता व दुग्धोत्पादन कसे वाढवायचे हेदेखील शिकणार आहात.
ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा
"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"
Course Curriculum
-
Startवासरे आणि कालवडींसाठी कोणत्या प्रकारचा निवारा, गोठा असावा? (4:35)
-
Startवासरू जन्माला आल्याबरोबर त्याची लगेच कोणती काळजी घ्यावी? (4:05)
-
Startकोलोस्ट्रम किंवा खीस वासराला आजारांपासून कसे वाचवते ? (1:08)
-
Startवासराला पहिला चीक कसा पाजावा ? (1:07)
-
Startवासरांना आपण चीक किती प्रमाणात पाजला पाहिजे ? (1:05)
-
Startकोलोस्ट्रम म्हणजेच चीक चांगल्या दर्जाचा आहे किंवा नाही हे कसे ओळखावयाच ? (0:55)
-
Previewवासराला किती दूध पाजावे ? (2:16)
-
Startनवीन जन्मलेल्या वासरात कोणते आजार आढळतात? (0:36)
तुम्ही हा अभ्यासक्रम खरेदी केल्यावर तुम्हाला पुढील गोष्टी मिळतील:
30 पेक्षा अधिक व्हिडिओ तात्काळ उपलब्ध होतील
कालवडींसाठी आहार सूत्र तयार करण्याचा तक्ता
योग्य वजनाचा तक्ता
लसीकरणाचा तक्ता
एका वर्षासाठी तज्ञांचे मार्गदर्शन
वासरू व कालवड व्यवस्थापनावरील हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील:
तुमच्या शेतातील वासरांचा मृत्यू होऊ न देणे
तुमच्या वासरांना व कालवडींना योग्य पशुखाद्य देणे
वासरांची शिंगे कापणे
वासरांच्या कानाला टॅग लावणे
वासरांना वेळापत्रकानुसार जंतनाशक औषध देणे
वजन जास्तीत जास्त वाढवणे
तुमच्या कालवडी योग्य वेळी वयात येतील असे पाहणे
आत्मविश्वासाने वासरांचे आजार ओळखणे व हाताळणे
तुमच्या वासरांना यशस्वीपणे वाढवून उत्पादक प्रौढ जनावरे तयार करणे
Frequently Asked Questions
अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.