प्रजनन व पुनरुत्पादन समबंधी समस्या

दुभत्या पशूंमधील पुनरुत्पादनाशी निगडीत असणाऱ्या समस्या कमी कशा करता येतात जे जाणून घ्या. दरसाली आपल्या पशुचे एक वेत पूर्ण करा.

   Watch Promo

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.

एका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.

आपल्या डेअरी फार्ममधील एखादा चांगल्या गुणवत्तेचा पशू आपण दुसऱ्या कोणाला विकायला तयार व्हाल का? सामान्य परिस्थितीमध्ये, कोणतीही व्यक्ती आपले दर्जदार जनावर बाजारात विक्रीसाठी उभे करणार नाही. का, असे आपण विचारू शकता. कारण, पशूची अनुवंशिकता, मादीची कार्यक्षमता, पर्यावरण आणि व्यवस्थापनाची कार्यशैली इत्यादी घटक एकत्र येऊन त्या पशूची गुणवत्ता व दर्जा ठरवतात तसेच अशा उच्च दर्जाचा वंश पुढे वाढवून आपल्या दुग्ध व्यवसायास भरभराटीचे दिवस मिळवून देतात. अशी गुणवत्तापूर्ण जनावरे मिळणे तेवढे सोपे नाही.

टेप्लू मध्ये आम्ही यावर असा अनोखा कोर्स तयार केला आहे ज्यामध्ये प्रजनन तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करून निरोगी आणि अधिक दूध उत्पादन देणारी दुभत्या पशूंची पुढची पिढी कशी तयार करावी याची सखोल माहिती दिली जाईल. रेतनासाठी योग्य प्रकारचा वळू निवडण्यापासून ते नाते-संबंधातील प्रजनन टाळून माजावर येताना भेडसावणाऱ्या समस्या, दर्जेदार वंशाचे जतन करण्यापासून तो वाढवण्यापर्यंतच्या शास्त्रोक्त पद्धती अशा सर्व घटकांचे मार्गदर्शन केले जाईल.

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आम्हाला सतत एक प्रश्न ऐकायला मिळतो तो म्हणजे त्यांच्या पशूंची गर्भधारणा वेळेवर होत नाही. ज्यावेळी अशी स्थिती उद्भवते, तेव्हा दूध उत्पादन होण्यास उशीर होतो, साहजिकच होणाऱ्या खर्चात वाढ होऊन आर्थिक नफ्यात घट जाणवू लागते. दुधाळ पशूंच्या पुनरुत्पादन आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. यशस्वी डेअरी व्यवसाय चालवणारे शेतकरी दर 12 ते 16 महिन्यांमध्ये आपल्या पशुपासून एका वासराची पैदास करतातच!

टेप्लू मध्ये, विडियो प्रणालीवर आधारित हा कोर्स तयार करताना पशुवैद्यकीय क्षेत्रातील प्रजनन तज्ञांचा आम्ही पुरेपूर वापर केलेला आहे. या कोर्सच्या माध्यमातून दुभत्या पशूची विण्यापूर्वी आणि विल्यानंतर कशी काळजी घ्यावी याबद्दलची प्रत्येक मिनिटाची माहिती टिपली असून लहान- लहान मुद्दे अधोरेखित केले आहेत. पुनरुत्पादनासंबंधी समस्या सोडवून दुभत्या पशूंचे दर्जेदार वाण आपल्या डेअरी फार्ममध्ये कसे वाढवावे हे या कोर्सच्या माध्यमातून आपण नक्की शिकून घ्या.

आपल्या प्रशिक्षकांना भेटा


Your Instructor


डॉ. अतुल सुभाष  फुले
डॉ. अतुल सुभाष फुले

शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आरोग्य सेवा प्रदान करणारे एक पशुवैद्यकीय तज्ञ म्हणून त्यांच्याकडे 20 हून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी परभणी येथील पशुवैद्यकीय व पशु विज्ञान महाविद्यालयातून बीव्हीएससी व ए.एच.ची पदवी घेतली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना दूध उत्पादक शेतकाऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने त्यांना दुभत्या पशूंच्या प्रजनन आणि पुनरुत्पादनविषयक समस्या यांची चांगली जाण असून तअशा समस्यांचे निराकरण करण्याचा अनुभव पाठीशी आहे.

पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यामधील दरी कमी करत डॉ. फुले असंख्य विद्यार्थी आणि पशुधन तज्ञांना कृत्रिम रेतन पद्धती आणि प्रजनन समस्यांचे व्यवस्थापन या विषयांवर आजवर सखोल मार्गदर्शन करत आलेले आहेत. त्यांनी पशुधन क्षेत्रातील नामांकित संस्थांसोबत काम केले आहे आणि वर्षानुवर्षे असंख्य पशु आरोग्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.


या कोर्समधून आपण काय शिकाल?

हा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा


या कोर्सचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होईल?

हा कोर्स प्रजनन व पुनरुत्पादन समस्या व त्यांचे समाधान या विषयाचा आपला पाया पक्का करेल, ज्यामुळे डेअरी फार्म यशस्वीरित्या चालवण्याचे व्यवस्थापन कौशल्य आयुष्यभरासाठी आपणाला आत्मसात होईल. आपल्या फार्ममध्ये पुनरुत्पादनच्या समस्यांना प्रतिबंधित करण्यात आणि सध्याच्या घडीला पशूंमध्ये या समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यात हा कोर्स नक्कीच मदत करेल.

बाजारामध्ये आपल्याला चांगली किंमत मिळवून देणाऱ्या दुभत्या पशूंची पैदास करण्यासाठी कशा प्रकारची रेतन पद्धती अवलंबावी हे या कोर्सच्या माध्यमातून आपणाला शिकवले जाईल. दुभत्या पशूंचे जीवनचक्र, प्रतवारी, नाते संबंधातील प्रजनन, माजावर येण्याचे चक्र इ. सारख्या मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करून आपणाला पशूंच्या पुनरुत्पादनासंबंधी प्रशिक्षित केले जाईल जेणेकरून आपल्या पशुपासून दरवर्षी आपणाला एक वासरू मिळू शकेल.

दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी होण्याकरता, आपणाला कृत्रिम रेतन पद्धती, पशू माजावर येताना ओळखणे, गाभण पशू ओळखणे, पशूच्या प्रसुतीचे निरीक्षण करणे या गोष्टी शिकणे गरजेचे आहे. या कोर्सच्या माध्यमातून आपणाला एक तक्ता दिला जाईल, ज्याद्वारे आपल्या पशूंचे निरीक्षण करून नोंदी ठेवता येतील ज्यामुळेसंभाव्य प्रजननासंबंधी येणाऱ्या समस्यांच्या सूचना आणि आकलन आपणाला वेळीच होईल. यासोबतच जनावरांच्या पोटात होणाऱ्या जंतांचा प्रतिबंध कसा करावा हेदेखील शिकाल.

तसेच, पशू विण्यादरम्यानच्या किंवा संक्रमण कालावधीमध्ये घेण्यात येणारी काळजी कशी घ्यावी, पशुचा भाकड कालावधी कसा सुरू करावा याचीदेखील माहिती आपण घेऊ शकाल. दुभत्या पशूंना भेडसावणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या तसेच पुनर्र-प्रजननासंबंधी समस्या कशा सोडवाव्यात याचे कौशल्य हा कोर्स पूर्ण होताना आपल्या अंगी येतील. या कोर्सद्वारे, आपल्याला पशू सौम्य माजावर येणे, प्लासेंटा (आर.ओ.पी), मेट्रिटिस, वासरांचे गर्भातील मृत्यू या आणि अशा प्रजननसंस्थेशी निगडीत असणाऱ्या समस्या सोडण्यासाठी आपल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत हातभार लावण्यास प्रशिक्षित करेल.

ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा

 

"आपल्या करिअरच्या संधी वाढवा"

Course Curriculum


  प्रजनन व पुनरुत्पादनासमबंधी समस्या
Available in days
days after you enroll

 

हा कोर्स घेतल्यानंतर या कोर्ससोबत आपणाला खालील गोष्टी मिळतील:

४0 हून अधिक विडियोज्चा त्वरित ऍक्सेस

एका वर्षासाठी तज्ञांचे मार्गदर्शन

डाउनलोड

पुनरुत्पादन निर्देशांकाचा तक्ता

लसीकरण तक्ता


प्रजनन आणि पुनरुत्पादन समस्यांवर आधारित हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील घटक शिकाल:

correct bull or semen straw for insemination

पुनरुत्पादनासाठी योग्य वळूची किंवा वीर्याची निवड करणे

Inbreeding in cows buffaloes

आपल्या फार्ममधील पशूंच्या जवळच्या नात्यांमधून होणारे प्रजनन टाळणे

cows buffaloes in heat timely detection of heat

माजावर आलेला पशू ओळखणे

Call veterinarian for artificial insemination of cow

कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना वेळेवर बोलावणे

Detect problems in cows

संभाव्य पुनरुत्पादन समस्यांची शक्यता होण्याअगोदरच ओळखणे

Prevent reproductive problems in cows

आपल्या फार्ममध्ये पुनरुत्पादन समस्या न होऊ देणे

pre and post calving care

आपल्या पशूंची विण्यापूर्वी तसेच विल्यानंतर उत्तम काळजी घेणे

One calf a year

प्रत्येक वर्षी पशुचे एक वेत घेणे


Frequently Asked Questions


हा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल?
आपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.
हा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल?
एका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.
मी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का?
या कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.
मला जर इतर समस्या असतील तर?
कोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला support@teplu.in या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.
हा कोर्स कोणासाठी लागू आहे? हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का?
हा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.

अभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.